Home » माझा बीड जिल्हा » नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय.

नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय.

नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय.

परळी वैजनाथ / प्रतिनिधी

– सभापती गोपाळ आंधळे यांच्या पाठपुराव्याला यश
न.प.गटनेते वाल्मिक कराड यांच्या सहकार्याने
प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय.

परळी – सध्या परळी शहरात कोरोनांची दुसरी लाट रौद्ररूप घेत असुन दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी न.प. गटनेते वाल्मिक कराड यांच्या कडे प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. त्यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे यांना सुचना केली. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून या आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्ध पञकाद्वारे केली आहे.
सध्या परळी शहरात केवळ उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. परंतु शहराची लोकसंख्या लक्षात घेता हे लसीकरण केंद्र वाढवणे गरजेचे होते. आणि उपजिल्हा रुग्णालयात हे केंद्र दुसर्या मजल्यावर असल्यामुळे जेष्ठ नागरिकांना पाय-या चढुन जाणे अवघड झाले होते. त्यामुळे शहरात लसीकरण केंद्र वाढवणे गरजेचे होते. ही बाब न.प.गटनेते वाल्मिक कराड यांच्या निदर्शनास आणून दिली. श्री कराड यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे यांना प्रभाग क्रमांक पाच मधील खंडोबा मंदिर शेजारी असलेल्या नागरी आरोग्य केंद्रात पुढील आठवड्यापासून येथे कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. यामुळे जुन्या परळी गावभागातील नागरीकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी केलेल्या मागणी तात्काळ मार्गी लावल्या बद्दल न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण मोरे व उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर दिनेश कुरमे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.