Home » माझा बीड जिल्हा » कॅन्टीनची केली पहाणी – अँड.अजित देशमुख.

कॅन्टीनची केली पहाणी – अँड.अजित देशमुख.

कॅन्टीनची केली पहाणी – अँड.अजित देशमुख.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– सरकारी दवाखान्यातील कॅन्टीनची अँड. अजित देशमुख यांनी केली पाहणी

बीड / बीड जिल्ह्याचे सरकारी रुग्णालय येथे असलेल्या कॅन्टीनची पाहणी अचानक रीतीने करण्यात आली. यावेळी कॅन्टीन मधील काम पाहण्याचे कंत्राट ज्यांना मिळालेले आहे, त्या अब्दुल गणी बागवान यांनी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांना चालू असलेल्या स्वयंपाकाबद्दलची माहिती देत, कॅन्टीन मधील सर्व परिसर दाखवला.

गेल्या महिनाभरात कॅन्टीन मधून जेवण योग्य प्रकारे दिले जात नाही, करपलेल्या चपात्या रुग्णांना दिल्या जात आहेत. त्या पोळ्या थंड झाल्या नंतर खाता येत नाहीत, अशा प्रकारची तक्रार जन आंदोलनाला प्राप्त झाली होती. यानंतर रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाला याबाबत अवगत देखील करण्यात आले होते.

दरम्यान या कॅन्टीनची अचानक पाहणी केल्यानंतर कॅन्टीन मध्ये सर्वत्र अत्यंत चांगल्या प्रकारची स्वच्छता आढळून आली. काम करणाऱ्या कर्मचारी वर्गास स्वतंत्र असा ड्रेस देण्यात आलेला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग स्वच्छ असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. त्याच बरोबर स्वयंपाक देखील चांगल्या प्रकारे चालू होता. पूर्व सूचना देऊन केलेल्या तपासणीत त्या ठिकाणी देखील दक्षता घेऊन जात घेतली जाऊ शकते. मात्र अशा अचानक पाहणीत स्वच्छता दिसली तर तीच खरी पाहणी असते.

कॅन्टीन चालक यांनी रुग्णांना चहा, पाणी, नाश्ता, काढा आणि जेवण कोणत्या वेळी कशा पद्धतीने द्यावे लागते, याची माहितीही दिली. कधी-कधी रुग्णां बरोबर असलेले नातेवाईक देखील जेवणासाठी पुढे आले तर आम्ही त्यांना रोखत नाहीत, असे सांगून कधी-कधी अतिरिक्त जेवन देखील आम्हाला द्यावे लागते, त्यातही आम्ही मागेपुढे पाहत नाहीत, असे अब्दुल गणी बागवान यांनी म्हटले.

या कॅन्टीन मधून रुग्णांना चहापाणी, जेवण, नाश्ता, काढा इत्यादी पुरविले जात आहे. यावेळी चालू असलेल्या स्वयंपाकाची पाहणी केल्यानंतर अँड. देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. बागवान यांनी यात आणखी काही सुधारणा आवश्यक आहे का ? असेल तर सांगा. ती सुधारणा करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे सांगून या ठिकाणी रुग्नसेवा म्हणून आम्ही चांगलेच काम करणार आहोत, असे आश्वासन दिले.

दरम्यान अन्य रुग्णांसह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पाहण्यासाठी वॉर्डामध्ये जाता येत नाही. त्याचप्रमाणे अनेक नातेवाईक रुग्णांना डबा आणून देऊ शकत नाहीत. त्यामुळे कॅन्टीन चालक आणि कर्मचाऱ्यांसाठी रुग्णांची चांगल्या प्रकारची सेवा करण्याची ही संधी आहे. दुर्दैवाने रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णांना उच्च प्रतीचे आणि शासन नियमाप्रमाणे ठरलेले जेवण देऊन चांगली रुग्णसेवा करावी आणि स्वच्छतेची टापटीप अशाच पद्धतीने कायम चालू ठेवावी, असे अँड. अजित देशमुख यांनी यावेळी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published.