प्रसिद्ध गायिका रसिका धामनकर यांच्या आवाजात रंगली सुरमयी होळी..
– धनश्री नाईक आणि राजेंद्र कांबळे यांचा अनौखा उपक्रम..
डोंगरचा राजा / ॲानलाईन
मुंबई – होळीच्या सणानिमित्त आयोजित करण्यात आले गा रंग बरसे या म्युझिकल होळी गीतांचा कार्यक्रम मैसूर हॉल माटुंगा मुंबई येथे रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. कला म्युझिक अकादमीतर्फे धनश्री नाईक आणि राजेंद्र कांबळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात लोकप्रिय होळीगीते आणि नृत्य सादर करून संगीतमय होळी खेळण्यात आली.
याप्रसंगी मनोज भाई संसारे यांनी उपस्थित राहून आयोजक व गायकांना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच अभिनेत्री व गायिका रसिका धामनकर आणि नेहा केळकर यांनी सेलिब्रिटी गायक म्हणून आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच गायिका धनश्री नायक, राजेंद्र कांबळे, चांदणी दीदारसिंग,रितेश वंजारी, प्रमोद तांबे, शैलेश शिंदे, जागेश्वर राठोड, संजीव नासिर, पटेल मजीद, अजय गुप्ता,परेश इसरार,मन्नु खान, सुनील मांजरेकर या गायकांनी एकापेक्षा एक सरस धमाल होळी गीते सादर केली तसेच निवेदक विजय ओव्हळ यांनी सूत्रसंचालन आणि दर्जेदार निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.गेली अनेक वर्ष कला म्युझिक अकादमी तळागाळातील नवोदित गायकांना प्रशिक्षण व सुसंधी देऊन त्यांचा आवाज थेट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.