Home » माझा बीड जिल्हा » ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा.

ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा.

ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना अधिमंडळाची ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याची सन 2019 – 20 या वर्षाची 31 वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाचे पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पद्धतीने शनिवारी दिनांक 27 /3 /2021 रोजी कारखान्याचे चेअरमन श्री.धैर्यशील सुंदरराव सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 – 00 वाजता कारखाना कार्यस्थळावर ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती.परंतु सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने पोट नियमातील तरतुदीनुसार दोन तास सभा पुढे ढकलण्यात येऊन सभेचे कामकाज दुपारी 3 – 00 पासून चालू करण्यात येऊन सदरील सभेमध्ये विषय पत्रिकेवरील क्रमांक 1 ते 11 सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेच्या प्रारंभी कारखान्याचे संस्थापक स्व.सुंदररावजी सोळंके यांच्या प्रतिमेचे पुष्पांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संचालक श्री.प्रकाश शिंदे यांनी केले. प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक,सभासद यांनी सभेच्या कामकाजात ऑनलाईन सहभाग नोंदवला.यावेळी कार्यकारी संचालक श्री.एम.डी.घोरपडे यांचेसह सर्व खातेप्रमुख covid-19 या आजाराचे नियम उदा: मास्क व सामाजिक अंतराचे पालन करून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.