Home » माझी वडवणी » ८५ वर्षाच्या वयोवृद्धाचं जिल्हाध्यक्ष बादाडेंनी केलं स्वागत.

८५ वर्षाच्या वयोवृद्धाचं जिल्हाध्यक्ष बादाडेंनी केलं स्वागत.

८५ वर्षाच्या वयोवृद्धाचं जिल्हाध्यक्ष बादाडेंनी केलं स्वागत.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– वडवणीत मनसेच्या सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद.

वडवणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान सर्वत्र चालू आहे. बुधवारी वडवणी येथे सदस्य नोंदणी अभियानाला ८५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीने स्व:इच्छेने मनसेची सदस्य नोंदणी केली. जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी त्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला बीड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील आणि महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई अंबुरे यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव, वडवणी, धारुर या ठिकाणी राबविण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी वडवणीमध्ये बीड-परळी हायवे रोडवर छत्रपती शिवराय चौकात मनसेचा मंडप देऊन सदस्य नोंदणी स्टाँल सुरू करण्यात आला होता.यावेळी मनसेत नोंदणी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत होते. त्याच वेळी एका वयोवृद्ध ८५ वर्षीय नागरिकाने स्वयंस्फूर्तीने सदस्य नोंदणी स्टाँँलवर येऊन आपला फोटो समोर केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोटो हातात घेत त्यांना विचारले असता मला मनसेचे सदस्य व्हायचे आहे अशी भावना उपळी येथील वयोवृद्ध माधव सावंत नामक व्यक्तीने व्यक्त केली.यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई अंबुरे यांनी सावंत यांचे अभिनंदन केले. यावेळी तालुकाध्यक्ष नवनाथ करांडे, किसान सेना अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सखाराम ढगे, गोरख शेंडगे, ईश्वर पुजारी,तालुका उपाध्यक्ष नवनाथ दराडे,महिला तालुकाध्यक्ष दीक्षा डोंगरे, शहराध्यक्ष उषा खळगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करण्यात आली . दिवसभर कार्यकर्त्यांची नोंदणी या ठिकाणी चालू होती. मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचणार असल्याचे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे आणि महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई अंबुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.