Home » माझी वडवणी » आईच्या दिवसा दिवशीच मुलाचा मृत्यू..

आईच्या दिवसा दिवशीच मुलाचा मृत्यू..

आईच्या दिवसा दिवशीच मुलाचा मृत्यू..

– साळेगाव येथील प्रभाकर गालफाडे यांचा कोरोनाने मृत्यू !

केज – एखाद्या कुटुंबाच्या वाट्याला दुःख किती आणि कधी असेल याचा काही नेम नाही. अशीच एक दुर्दैवी घटना केज तालुक्यातील साळेगाव येथे घडली आहे. आईच्या मृत्यू नंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे दिवस घालण्याच्या दिवशीच मुलाचा मृत्यू झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील प्रभाकर बब्रुवाहन गालफाडे वय (४० वर्ष) हा अंबाजोगाई येथे स्टेट बँक ऑफ इंडियात खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून रोजंदारीवर काम करीत होता. मागील आठवड्यात बँकेतील काही कर्मचाऱ्यास कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे प्रभाकर गालफाडे हा त्या कर्मचाऱ्याचा सहवासीत असल्याने त्याला कोरोनाची लागण झाली असावी. प्रभाकर गालफाडे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे दि. १९ मार्च पासून त्याच्यावर स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील कोरोना वॉर्डात भरती करण्यात आले होते. त्याचे दि. २४ मार्च बुधवार रोजी पहाटे निधन झाले. प्रभाकर गालफाडे याच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. प्रभाकर गालफाडे हा अत्यंत मनमिळावू, शांत आणि गरीब स्वभावाचा होता.

 

चौकट :-

प्रभाकर गालफाडे यांची आई कस्तुरबाई बब्रुवाहन गालफाडे यांचा दि. २२ मार्च रोजी सकाळी ८:०० वा. घशात दुखत असल्याने कोरोना सदृश्य लक्षणाने मृत्यू मृत्यू झाला होता.
त्यांचा आज राख सावडण्याचा व दिवसाचा कार्यक्रम होता. त्यातच आई पाठोपाठ मुलाचाही मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.