Home » माझी वडवणी » मनुष्यबळ कमी असल्याने लोक ताटकळले.?

मनुष्यबळ कमी असल्याने लोक ताटकळले.?

मनुष्यबळ कमी असल्याने लोक ताटकळले.?

– केज / जय जोगदंड

– कोरोना तपासणी केली नाही तर दुकाने सील केली जातील – तहसीलदार मेंडके यांचा इशारा

– कोरोना केंद्रावर तपासणी करून घेण्यासाठी व्यावसायिकांची गर्दी मात्र मनुष्यबळ कमी असल्याने लोक ताटकळले

केज – तालुक्यातील व्यावसायिकांनी कोरोना तपासणी करून घ्यावी अन्यथा दुकाने बंद केली जातील असा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे.

केज तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यातील हॉटेल्स, किराणा दुकाने, सलून, चहाचे हॉटेल व टपऱ्या व इतर व्यावसायिक यांनी प्रत्येकांनी आपली कोरोना तपासणी करून घेण्यासाठी आदेश काढले आहेत. परंतु अद्याप केज शहर आणि ग्रामीण भागातील व्यावसायिक यांनी तपासनी करून घेतलेल्या नाहीत. जर लवकरात लवकर दुकानार, व्यावसायिक यात किराणा दुकानदार, टपरी चालक, हॉटेल्स चालक आणि इतर व्यावसायिक यांनी तपासणी केली नाही तर प्रशासन कठोर पावले उचलणार आहे. स्थानिक तलाठी, ग्रामसेवक आणि यांनी कोरोना तपासणी बाबत कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी दिले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील व्यावसायिकांनीही कोरोना तपासणी करून घ्यावी.

चौकट :-

कोरोना तपासणी न करणाऱ्या केज शहरातील व्यावसायिकांवर कार्यवाही करून दुकाने सील करताच तपासणीसाठी गर्दी झाली आहे मात्र केंद्रावर मनुष्यबळ खूप कमी असल्याने मनुष्यबळ वाढविण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.