Home » ब्रेकिंग न्यूज » केज पोलीसांनी दोन वाळूचा ट्रक पकडल्या.

केज पोलीसांनी दोन वाळूचा ट्रक पकडल्या.

केज पोलीसांनी दोन वाळूचा ट्रक पकडल्या.

– केज / जय जोगदंड

केज तालुक्यातून उस्मानाबाद जिल्हा कडे जाणाऱ्या वाळूच्या दोन ट्रक वाहतूक शाखेने ताब्यात घेतले असून त्यातील गौण खनिजाच्या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी तहसील कार्यालयाला कळविले आहे.

दि. १७ मार्च रोजी दुपारी १:०० वा. च्या दरम्यान केज येथील धारूर रोड, जय भवानी चौकातून वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक क्र.
(एमएच-४५/टी-६७६४) व
(एमएच -१२/एफझेड-७५३६) या मधून वाळूची वाहतूक होत असून त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबकडे जात असल्याची गुप्त माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. त्या नुसार वाहतूक शाखेचे हनुमंत चादर यांनी सापळा लावून सदरील दोन्ही गाड्या अडवून त्या पोलिस स्टेशनला आणल्या. संबंधित वाळू वाहतूक करणाऱ्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना होता; परंतु त्यात परवानगी पेक्षा जास्त वाळू वाहतूक करीत असल्याचा संशय आल्यामुळे पोलिसांनी सदर प्रकरणी केज तहसीलदारांना पत्र देऊन गौण खनिज संदर्भात सदर गाड्यातील वाळू साठ्याचे मोजमाप करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी तहसीलच्या गौण खनिज विभागाला कळविले आहे. त्यानुसार तब्बल चोवीस तास उलटून गेल्या नंतर केज तहसीलचे मंडळाधिकारी भागवत पवार यांनी सदर गाड्यांचा पंचनामा करून त्यातील वाळू साठ्याचे पंचासमक्ष मोजमाप केले. त्याचा अहवाल वरिष्ठांना दिलेला आहे. त्यानुसार पुढे यावर काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.