Home » माझी वडवणी » मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी ओमप्रकाश साबळे तर सचिवपदी अंकुश गवळी यांची निवड.

मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी ओमप्रकाश साबळे तर सचिवपदी अंकुश गवळी यांची निवड.

मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी ओमप्रकाश साबळे तर सचिवपदी अंकुश गवळी यांची निवड.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

वडवणी – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशाने व राज्य समन्वयक अनिलराव वाघमारे यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र राज्य सोशलमिडिया सेल वडवणी तालुका अध्यक्षपदी ओमप्रकाश साबळे यांची तर सचिवपदी अंकुश गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद हि मुख्य विश्वस्त मा.एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासह देशात पत्रकारांच्या हिताचे काम करत आहे तरी त्याच अनुशंगाने एस.एम.देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी व परिषदेचे कार्यक्रम, आंदोलने याला यु ट्युब चँनल,पोर्टल, फेसबुक लाईव्ह वर सोशलमिडियाच्या माध्यमातून थेट प्रसिद्धी देण्यासाठी सोशलमिडिया वडवणी तालुक्याच्या नवीन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्य समन्वयक अनिलराव वाघमारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सोशल मीडिया वडवणी तालुका अध्यक्षपदी ओमप्रकाश साबळे यांची तर सचिवपदी अंकुश गवळी यांची निवड करण्यात आली आहे. तरी यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सोशलमिडिया सेल महाराष्ट्र राज्य समन्वयक अनिलराव वाघमारे, मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका अध्यक्ष अँड. विनायक जाधव,अँड. के.डी.काळे,माजी अध्यक्ष सुधाकर पोटभरे,सचिव सतिषराव सोनवणे, कोषाध्यक्ष शांतीनाथ जैन,सदस्य नामदेव सवासे,रामेश्वर टिपरे,वाजेद पठाण, यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.