Home » माझा बीड जिल्हा » भाजपा प्रवक्ते पत्रकार राम कुलकर्णी यांची संवेदनशिलता.

भाजपा प्रवक्ते पत्रकार राम कुलकर्णी यांची संवेदनशिलता.

भाजपा प्रवक्ते पत्रकार राम कुलकर्णी यांची संवेदनशिलता.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– वाढदिवश सेलीब्रेशन रद्द करून स्वातंत्र्य सैनिकाचा विधवा पत्नीला केली आर्थीक मदत.

माजलगाव – येथील स्वातंत्रय सैनिकाच्या विधवा पत्नी श्रीमती पार्वतीबाई शंकरराव मुळे वय 88 यांची वृद्धाप काळात सुरु असलेली परवड वर्तमान पत्रात वाचल्या नंतर भाजपाचे राज्य प्रवक्ते तथा जेष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांनी त्यांच्या वाढदिवशाचे सेलीब्रेशन रद्द करुन मुळे कुंटूबीयांना भेटून आर्थीक मदत करुन आपल्या ऱ्हदयात दडलेली संवेदनशिलता दाखवून दिली
राजकारणी पत्रकार असलेल्या राम कुलकर्णी यांच्या भुमीकेचे सर्वत्र कौतुक होत आहे देशाचा स्वातंत्र्याची पंचाहतरी साजरी होतांना आशा उपक्रमातून राष्ट्रभक्ती सह सामाजिक जाणिव तेच समर्पन घडते हे नक्कीच
श्रीमती पार्वतीबाई मुळे ह्या स्वातंत्रय सैनिकाचा विधवा पत्नी असून वयोमान परत्वे त्या कुठूंबीयाची परवड सुरु आहे , अनेक आजाराने त्या त्रस्त असून मिळणाऱ्या पेन्शन मधून कुंटूब चालत , त्यांची आर्थीक परवड आणि वृद्धापकाळात शारिरिक संघर्ष यावर पत्रकारांनी आवज उठवल्या नंतर समाजातील दानशुरा कडून मदतीचा ओघ सुरू झाला . 15 मार्च राम कुलकर्णी यांचा वाढदिवश मागच्या दहा वर्षा पासून मोठया प्रमाणावर आन्नदान करुन साजरा करतात . मात्र यंदा वाढता कोरोना आणि पार्वतीबाई मुळे यांची बातमी कानावर पडताच त्यांनी वाढदिवशाचे कार्यक्रम रद्द करतांना शहरात येवून मुळे परिवाराची भेट घेतली अंथूरानावर पडलेल्या पार्वतीबाईचा साडी चोळी देवून शिवाय आर्थीक मदत देवून सन्मान केला . शब्द ओठातून बाहेर न पडणाऱ्या मातोश्नीचा मिळालेला मुक्या भावनेचा आर्शीवाद माझ्यासाठी लाखमोलाचा आहे आशी प्रतिक्रिया राम कुलकर्णी यांनी दिली माझा आदर्श स्व गोपीनाथ मुंडे साहेबांनी दाखवून दिलेला हा सामाजिक जाणिवतेचा रस्ता असल्याचे ते म्हणाले . या वेळी भाजपा तालूका अध्यक्ष अरुण राऊत , पत्रकार उमेश मोगरेकर , प्रा .एस .पी . कुलकर्णी ,कमलेश जाब्रस .बहादूर कुलकर्णी , लव्हुदास हंगे , सार्थक कुलकर्णी , बालाजी केंद्रे , बी एन . कुलकर्णी प्रा . मुळे , नरेंद्र जोशी आदी मान्यवरांची उपस्थीती होती .

Leave a Reply

Your email address will not be published.