Home » ब्रेकिंग न्यूज » सरकारी दवाखान्यात निकृष्ट दर्जाचे जेवण.

सरकारी दवाखान्यात निकृष्ट दर्जाचे जेवण.

सरकारी दवाखान्यात निकृष्ट दर्जाचे जेवण.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले – अँड.अजित देशमुख.

बीड – कोरोना पॉसिटीव्ह पेशंटवर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीने जेवण न देता रुग्णालयात निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. करपलेल्या आणि काळ्या चपात्या या निकृष्ट दर्जाच्या गव्हाच्या दिल्या जात आहेत. ही बाब जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी यात तात्काळ लक्ष घातले आहे. दरम्यान शल्य चिकित्सक गिते यानी संबधीत कंत्राटदारास नोटीस काढत असल्याचे आम्हाला सांगितले आहे, अशी माहिती जण आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.

पेशंटच्या अनेक दिवसांपासून तक्रारी होत्या. या बाबत एका चपातीच्या फोटोसह जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची प्रत सिव्हिल सर्जन गिते यांनाही देण्यात आली होती. मात्र गीते यांनी तक्रारीकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी जगताप यांच्या आदेशानंतर जिल्हा रुग्णालय हलले.

दरम्यान, गीते यांनी जन आंदोलनाशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. आणि संबंधित कंत्राटदार याला नोटीस काढत असल्याचे सांगितले. रुग्णांना अशा प्रकारचे जेवण देणे योग्य नाही. ही बाब चुकीची आहे.

कोरोना रुग्णांनी घाबरू नये. त्याचप्रमाणे दवाखान्यात योग्य उपचार मिळतात. त्यामुळे खाजगी दवाखान्यात जाऊन जादा खर्च करू नये. सगळीकडे एकच उपचार आहेत. त्यामुळे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांनी सरकारी दवाखान्यात उपचार करून घेण्याची मानसिकता ठेवावी. जर काही कमतरता असेल तर ती जिल्हा रुग्णालय प्रशासनाला अथवा आम्हाला सांगावी.

जिल्हा रुग्णालयात जेवणाच्या कंत्राटावर लाखो रुपये खर्च केले जातात. जेवण, नाष्टा, वगैरे कसे द्यावे, याबाबत शासनाचे आदेश आहेत. मात्र याचे पालन केले जात नाही. रुग्णालय प्रशासनाने यावर लक्ष दिले पाहिजे. कारण रुग्णांना सेवा देणे प्रशासनाचे काम आहे.

जन आंदोलन कोरोना महामारीच्या काळात सुरवातीपासून सक्रिय आहे. त्यामुळे कोरोना आणि जनता यांचा आमचा सातत्याने संपर्क आहे. या काळात आम्ही अनेक लोकहिताची कामे केली आहेत. आम्ही कोरोना काळात जनतेसोबत आहोत. जनतेनेही नियम पाळावेत, असेही अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.