Home » माझा बीड जिल्हा » निलमताई गोरेंनी केली २५ हजारांची मदत..

निलमताई गोरेंनी केली २५ हजारांची मदत..

निलमताई गोरेंनी केली २५ हजारांची मदत..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

माजलगाव – शिवसेना नेत्या निलमताई गोरे नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात असतात.. माजलगाव येथील स्वातंत्र्यसैनिक शंकरराव मुळे यांच्या विधवा वयोवृद्ध पत्नी श्रीमती पार्वतीबाई मुळे यांच्या अत्यंत हलाखीच्या स्थितीबाबतची स्टोरी वाचून निलमताई अस्वस्थ झाल्या.. त्यांनी मला मेसेज करून या आजीबाईंना मला मदत करायची आहे असे सांगितले.. त्यानुसार त्यांनी आज स्थानिक शिवसेना पदाधिकारी मुंजाबा जाधव यांना पार्वतीबाई मुळे यांच्या घरी पाठवून त्यांना 25,000 रूपयांची रोख मदत दिली आहे.. यावेळी माजलगावच्या ज्या पत्रकारांनी पार्वतीबाई यांची व्यथा जगासमोर आणत त्यांना सर्व प्रकारची मदत केली ते सुभाष नाकलगावकर, हरिष यादव आणि पांडुरंग उगले उपस्थित होते.. आपणास विदित आहेच की दोन वर्षांपूर्वी पार्वतीबाई यांची दोन तरूण मुलं मृत्यूमुखी पडली.. आता त्यांच्या कुटुंबात 88 वर्षांच्या पार्वतीबाई आणि 60 वर्षांची त्यांची विधवा मुलगी मित्रवृंदा या दोघीच आहेत.. काळाने सातत्याने आघात केलेल्या पार्वतीबाई आज एकाकी जीवन जगत आहेत.. स्वातंत्र्य सैनिकांच्या या कुटुंबाला आर्थिक मदत केल्याबद्दल निलमताई, आपले मनापासून आभार..
मराठी पत्रकार परिषदेने जेव्हा जेव्हा मदतीचे आवाहन केले तेव्हा तेव्हा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे स्नेही डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मदत केलेली आहे.. पार्वतीबाई मुळे या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीची परवड पाहून विश्वंभर चौधरी देखील धावून आले आणि त्यांनी 5000 रूपये पार्वतीबाई यांच्या खात्यावर जमा केले आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published.