Home » माझा बीड जिल्हा » केज येथे पोलीसांचे लाठी चार्जचे प्रात्यक्षिक..

केज येथे पोलीसांचे लाठी चार्जचे प्रात्यक्षिक..

केज येथे पोलीसांचे लाठी चार्जचे प्रात्यक्षिक..

– केज / जय जोगदंड

केज – पोलिसांच्या वतीने बेकाबू जमाव नियंत्रनात आणून त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे व तो पांगविण्यासाठी पोलीस करीत असलेले लाठी चार्ज आणि बळाचा वापर याचे प्रदर्शन करण्यासाठी केज येथील शिवाजी चौकात पोलीसांनी लाठी चार्जचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

एखादे बेकायदेशीर कृत्य किंवा कायदा व सुव्यवस्थाथेला बाधा निर्माण होईल यासाठी एखादा बेकाबू जमाव नियंत्रणात आणून दंगल रोखण्यासाठी पोलिसाकडून इजा न होऊ देता त्यावर नियंत्रण आणून तो जमाव पांगवून कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलिसांकडून लाठी चार्जचा अवलंब केला जातो. याचे प्रात्यक्षिक केज येथील शिवाजी चौकात करण्यात आले. यावेळी पोलीसानी डोक्यावर हेल्मेट, सीन गार्ड व ढाल यासह लाठी चार्जचे प्रात्यक्षिक केले.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, सर्व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. रस्त्याने येजा करणारे प्रवासी व पादचारी हे प्रात्यक्षिक कुतूहलाने पहात होते.

Leave a Reply

Your email address will not be published.