Home » माझी वडवणी » लक्ष्मण मुंडे यांचे दुःखद निधन.

लक्ष्मण मुंडे यांचे दुःखद निधन.

लक्ष्मण मुंडे यांचे दुःखद निधन.

– डोंगरचा राजा / आँनलाईन

वडवणी – लक्ष्मण दिनाजी मुंडे राहणार सौंदड वस्ती वडवणी तालुका वडवणी यांचं दिनांक 8 /3 /2021 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने मुंडे परिवारावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की वडवणी जवळ सौंदड वस्ती येथील रहिवासी असणारे शेतकरी लक्ष्मण दिनाजी मुंडे वय 85 वर्ष यांचं दिनांक 8/03/2021 रोजी रात्री 03 – 30 वाजता निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात सौंदड वस्ती वडवणी याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अचानक निघून जाण्यानं मुंडे परिवारावर शोककळा पसरली आहे. श्री. मुंडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा तीन मुली,सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुंडे यांच्या दुःखात डोंगरचा राजा परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.