Home » माझा बीड जिल्हा » साळेगावच्या उपसरपंचपदी अमर मुळे

साळेगावच्या उपसरपंचपदी अमर मुळे

साळेगावच्या उपसरपंचपदी अमर मुळे

केज / जय जोगदंड

केज तालुक्यातील साळेगावचे उपसरपंच म्हणून अमर मुळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीमंत गित्ते यांनी दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच कैलास पाटील यांच्याकडे दिला होता. त्या नंतर दि.११ डिसेंबर रोजी सरपंच कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत राजीनामा मंजूर झाला व पद रिक्त झाल्याची कार्यवाही करण्यात आली.

त्या नुसार दि. ८ मार्च रोजी सरपंच कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी बैठक आयोजित केली होती त्यात अमर मुळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला; म्हणून साळेगावचे नूतन उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रभारी ग्रामसेवक ओम चोपणे यांनी सचिव म्हणून काम पाहिले.
या निवडीबद्दल नवनिर्वाचित उपसरपंच अमर मुळे यांचे सरपंच कैलास पाटील, त्यांचे सर्व सहकारी सदस्य मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.