Home » ब्रेकिंग न्यूज » जिल्हा बँकेचे सर्व अर्ज फेटाळले.

जिल्हा बँकेचे सर्व अर्ज फेटाळले.

जिल्हा बँकेचे सर्व अर्ज फेटाळले.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, बीड च्या घटना आणि नियमावली मधील तरतुदींना महत्त्व देत अखेर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांनी निवडणुकीतील उमेदवारी अर्ज फेटाळल्या बाबतची सर्व अपील फेटाळले आहेत. बँकेच्या उपविधी मधील तरतुदींप्रमाणे हे कामकाज झाले असून आता फक्त आठ जागांसाठी मतदान होईल. अकरा जागा काही काळासाठी रिक्त राहतील, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

जिल्हा बँकेसाठी आदर्श उपविधी तयार करण्यात आलेली आहे. ही उपविधी म्हणजे बँकेची घटना आणि नियमावली आहे. नियमावली मधील तरतुदी प्रमाणे निवडणूक घेणे आणि निवडणूक प्रक्रिया राबविणे, उमेदवारी अर्ज स्वीकारणे आणि तरतुदीत न बसणारे उमेदवारी अर्ज फेटाळने, याबाबतची प्रक्रिया चालायला हवी. या प्रक्रिये प्रमाणेच जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, बीड यांनी उमेदवारी अर्ज फेटाळले होते.

अकरा जागा आता रिक्त राहणार असून उर्वरित जागांसाठी आता मतदान होईल, असे चिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान अजून यावर उच्च न्यायालयात जाण्याची एक संधी या अकरा जागांवरील उमेदवार सोडणार नाहीत. मात्र तूर्तास तरी नियमावलीस महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांनी त्यांच्याकडे झालेली सर्व अपीले फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या अकरा जागांवर उमेदवारी अर्ज भरणार यांना उपविधी मधली तरतूद माहित होती का ? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. उपविधीला विभागीय सहनिबंधक यांनी देखील तेवढेच महत्त्व दिल्याने जन आंदोलनाने त्यांचेही आभार मानले आहेत.

या संदर्भात जन आंदोलनातर्फे अनेक ठिकाणी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. बीड जिल्हा बँक शेतकऱ्यांचा कणा म्हणून पुन्हा उभी रहावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अपात्र लोकांना आणि ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा लोकांना बँकेच्या परिसरात फिरकू देणे सुद्धा योग्य नाही. त्यामुळे जन आंदोलनाला जिल्हा बँकेत संदर्भात वेळो वेळी काळजी घ्यावी लागते. जनतेच्या हितासाठी आम्ही जिल्हा बँकेच्या कारभाराकडे सातत्याने लक्ष ठेवू, असेही अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.