Home » माझा बीड जिल्हा » युट्युब व पोर्टलच्या पत्रकारांना आवाहन.

युट्युब व पोर्टलच्या पत्रकारांना आवाहन.

युट्युब व पोर्टलच्या पत्रकारांना आवाहन.

डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– सोशल मीडिया सेल पदाधिकाऱ्यांच्या लवकरच निवडी

बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील युट्युब व पोर्टल च्या पत्रकारांना आवाहन करण्यात येत की,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,सोशल मीडिया सेल पदाधिकाऱ्यांच्या लवकरच निवडी जाहीर करण्यात येणार आहेत.यासाठी बीड जिल्ह्यातील युट्युब व पोर्टल च्या पत्रकारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आवाहन करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सोशल
मीडियामध्ये काम करताना पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सोशल मीडियाचे प्रश्न सोडविण्यासाठी व हक्क मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात जुने व मोठे संघटन असणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सोशल मीडिया सेलची स्थापना करण्यात आली आहे.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सूचनेवरून बीड जिल्ह्यातील युट्युब,वेबपोर्टेल,फेसबुक live इत्यादी सोशल मीडियामध्ये कार्यरत असणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारांचे संघटन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातही पुढील पदावर काम करण्यासाठी संघटन,कौशल्य व काम करण्याची आवड असणाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहे.
यामध्ये नियुक्त करण्यात येणारी पदे खालील प्रमाणे आहेत.यामध्ये १) मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया बीड जिल्ह्यासाठी अध्यक्ष-१ पद,
समन्वयक- १ पद,उपाध्यक्ष- १ पद,सचिव – १ पद,
कोषाध्यक्ष- १ पद तसेच बीड,गेवराई,आष्टी,पाटोदा,
शिरूर कासार,केज, अंबेजोगाई,परळी,माजलगाव,
वडवणी,धारूर या सर्व तालुक्यांसाठी अध्यक्ष-१ पद,समन्वयक-१ पद,उपाध्यक्ष-१ पद,सचिव -१ पद,कोषाध्यक्ष-१ पद अशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे.इच्छुकांनी लेखी अर्ज –
( प्रति.अनिल वाघमारे – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेल महाराष्ट्र राज्य..) अशा आशयाचे आपल्या आवडत्या पदासाठी मागणी अर्ज मोबाईल नंबर 9822548696 या व्हाट्स अप क्रमांकावर आपल्या नजीकच्या बातमींच्या लिंकसह
१५ मार्च २०२१ पर्यँत पाठवावीत असे आवाहनही
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलचे अनिल वाघमारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.