Home » ब्रेकिंग न्यूज » अपघातात या पाच जणांचा जागीच मृत्यू..

अपघातात या पाच जणांचा जागीच मृत्यू..

अपघातात या पाच जणांचा जागीच मृत्यू..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– पांगरबावडीजवळ भीषण अपघात; ट्रकने ऍॅपेरिक्षाला उडवले अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू,

– मायलेकराच्या मृत्यूने हळहळ

बीड, दि. ७ (प्रतिनिधी) ः बीड शहरापासून जवळच असलेल्या पांगरबावडीजवळ रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने ऍपेरिक्षाला उडविल्याने झालेल्या अपघातात तब्बल ५ जण जागीच ठार झाले असून पाच जण जखमी आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच ट्रकने पुढे घोडका राजुरीजवळ एका पीकअप रिक्षासह एका दुचाकीला उडविले असून त्यानंतर हा ट्रक पलटी झाला.

वडवणीहून बीडकडे ऍॅपेरिक्षामधून काही प्रवासी येत होते. सायंकाळी सातच्या सुमारास बीडहून भरधाव वेगाने आलेल्या (ट्रक क्र.एमएच ०९ , सौ.व्हि .९६४४) ट्रकने सदर अपेरिक्षाला उडविल. सदर ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत अससल्याचे सांगण्यात येते. अपेरिक्षाला धडक देऊन भरधाव वेगाने सदर ट्रक पुढे गेला. घोडका राजुरी जवळ तलावानजीक या ट्रकने एका पीकअप रिक्षाला धडक दिली. तसेच एका मोटारसायकललाही धडक दिली आणि त्यानंतर हा ट्रक पलटी झाला. पांगरबावडी जवळ झालेला अपघात इतका गंभीर होता होता की, यातील पाच जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन बालकांसह तीन महिलांचा समावेश आहे. मयतांमध्ये शारो सत्तार पठाण, तबस्सुम अजमल पठाण यांच्यासह रिहान अजमल पठाण ( वय ८ ), तमन्ना अजमल पठाण ( वय १० ) आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. तर अपेरिक्षाचा चालक घाटसावळी येथील सिद्धार्थ शिंदे याच्यासह जाईबाई कदम ( रा.कारळवाडी ), मुजीब कुरेशी, अश्विनी पोकळे ( रा.देवळा ) आणि गोरख सरसाडे यांचा समावेश आहे. या अपघातात शाहूनगर भागातील तबस्सुम अजमल पठाण आणि त्यांची मुले रिहान अजमल पठाण व मुलगी तमन्ना यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.