Home » ब्रेकिंग न्यूज » अन् तिनं विहिरीत उडी घेत;मुलाचा जीव वाचविला

अन् तिनं विहिरीत उडी घेत;मुलाचा जीव वाचविला

अन् तिनं विहिरीत उडी घेत;मुलाचा जीव वाचविला

– जय जोगदंड / केज

स्वतःचा जीव धोक्यात घालून प्राण वाचविणाऱ्या अंगणातवाडी कार्यकर्तीचा महिला व बालविकास विभागाने दखल घ्यावी.

केज – स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एका पंधरा वर्षाच्या विहिरीत बुडणाऱ्या विद्यार्थ्याला अंगणवाडी कार्यकर्तीने वाचविले.

या बाबतची माहिती अशी की, दि. ३ मार्च रोजी दुपारी २:३० वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील कोरेगाव येथील उंबराचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील विहिरी जवळ एक लहान मुलगा मोठमोठ्याने ओरडून मदतीसाठी आरडा ओरड करीत होता. त्याच वेळी विहिरी पासून काही अंतरावर गव्हाची कापणी करणाऱ्या उर्मिला लक्ष्मण शिनगारे या अंगणवाडी कार्यकर्तीने हा आरडा ओरडा ऐकला आणि त्या विहिरीकडे धावत गेल्या. तसेच शेतात काम करीत असलेल्या इतर महिलाही विहिरी भोवती जमा झाल्या होत्या. त्यांनी विहिरीतील दृश्य पाहून त्या घाबरल्या. तसेच विहिरीत उतरण्याची कुणाची हिम्मत होत नसताना उर्मिला शिनगारे यांनी त्या पाण्याने डबडबलेल्या चार ते साडेचार परस विहिरीत वैभव बळीराम लांब नावाचा एक चौदा ते पंधरा वर्षाचा मुलगा गटांगळ्या खात होता. हे पाहून उर्मिला शिनगारे यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता किंवा स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विहिरी उडी मारली आणि वैभव याला पकडून आधार दिला व त्याला वर काढले.

उर्मिला शिनगारे यांना पोहता येत होते. कदाचित जर अंगणवाडी कार्यकर्ती उर्मिला शिनगारे हिने उशीर केला असता किंवा त्या जवळ नसत्या तर वैभव लांब याच्या जीवाला धोका होता. यामुळे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून विहिरीत बुडणाऱ्या वैभव लांब याचा प्राण वाचविणाऱ्या उर्मिला शिनगारे यांचे व निखिल लांब या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या ज्या महिला व बालविकास विभागात अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून काम करीत आहेत; त्या विभागाने त्यांच्या कार्याची दखल घेण्याची मागणी गावातून होत आहे.

बाईट/चौकट :-
————————————————–

” आम्हाला दि. ४ मार्च रोजी आमच्या अंगणवाडीच्या कार्यकर्तीने एका पाण्यात बुडणाऱ्या मुलाचा प्राण वाचविला याचा आम्हाला अभिमान आहे. याची दखल घ्यायला हवी.”
—- श्रीमती लटपटे,
महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, केज जि. बीड
———————————————

” ज्यावेळी मी निखीलचा आवाज ऐकून विहिरीकडे पळत गेले आणि पाहिले तर वैभव बुडत असल्याचे दिसले तेव्हा मी मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी मारली आणि कदाचित तो माझाच मुलगा आहे; या भावनेने मी त्याला वाचविले. तसेच मला पोहता येत होते. त्यामुळेच मी त्याचा जीव वाचवू शकले. ”
—- उर्मिला शिनगारे,
अंगणवाडी कार्यकर्ती, कोरेगाव
ता. केज

Leave a Reply

Your email address will not be published.