असा शेवट होणे वेदनादायी..?
– डोंगरचा राजा / ॲानलाईन.
– नाट्य कलावंत सौदागर जाधव यांनी घेतला जगाचा निरोप उद्या होणार अंत्यसंस्कार.
– कलावंत मग तो कोणताही असो असा शेवट होणे वेदनादायी.
ज्यांनी आपलं आयुष्य अंबाजोगाई च्या नाट्य रसिका साठी खर्च केलं, लॉक डाऊन काळात वृद्ध अवस्थेतील याच सौदागर जाधवला जनसहयोगच्या शाम सरवदे यांनी दोन वेळच जेवण पुरवलं अशा हरहुन्नरी नाट्य कलावंत सौदागर जाधव यांनी काल स्वा रा ती रुग्णालयात या जगाचा निरोप घेतला
असुन त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अंबाजोगाई ही कलावंतांची खानच आहे जणू या अंबाजोगाई ने नाट्यसृष्टीला तसेच सिनेसृष्टीला अनेक कलावंत दिले याच अंबाजोगाई शहरातील सतत उपेक्षित राहिलेला दुर्लक्षिलेला नाट्यकलावंत म्हणजेच सौदागर जाधव.सौदागरमध्ये असे काही अनोखे गुण निसर्गाने दीले होते की त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणुस अचंबीत होत असे.सुत्रसंचलन , अभिनय , लिखान या सगळ्या भुमिका ते लिलया पार पाडायचे.परीस्थितीने हतबल असलेला हा कलावंत ….बोलताना अनेकदा त्यांच्या डोळ्यात पाणी आलेल पाहील की मनात घालमेल निर्माण व्हायची..तात्पुरती मदत अनेकवेळा केली परंतु कायमस्वरुपी गुजरान होईल अशी मदत नाही करु शकलोत याची खंत जन्मभर मनामध्ये सलत राहील.सौदागर यांची शब्दफेक , व्यक्त होण्यातील अरोह अवरोहयुक्त संभाषण ,कधी कधी शब्द न उच्चारताही मुकाभिनयातुन (माईम) भावना व्यक्त करण्याची अनोखी पद्धत हे सगळ अजब होत.आज आपण एका हाडाच्या नाट्य कलावंताला मुकलो आहोत.
सौदागर यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अनेक भूमिका साकारल्या एवढेच नाही तर अंबाजोगाई मध्ये निर्माण झालेल्या एका सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका केली होती . सतत नाट्य क्षेत्राबद्दल डोक्यात वेड असणाऱ्या सौदागर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. उपजीविकेसाठी त्यांना अखेरपर्यंत आपले पारंपारिक काम करावे लागले . त्यासोबतच सर्जरी विभागातही ते काम करतच असत. काही दिवसापासून ते स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते आणि अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
अंत्यसंस्कार करण्यासाठी ही जवळचे कोणीही नातेवाईक उपलब्ध नाहीत असतील तरीही अद्याप पर्यंत कोणीही पुढे आलेले नाही त्यामुळे परीट समाजाचे युवा अध्यक्ष सचिन विलास जाधव, मराठी पत्रकार परिषद हल्ला विरोधी कृती समिती सदस्य अशोक दळवे यांच्या पुढाकाराने आज बोरूळ तलाव या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
अंबाजोगाईतील सर्व कलावंतांनी सकाळी ठीक दहा वाजता दिवंगत कलावंत सौदागर जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बोराळा स्मशानभूमीमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी केले आहे.