Home » माझा बीड जिल्हा » केज पोलिसांची धडक मोहीम..

केज पोलिसांची धडक मोहीम..

केज पोलिसांची धडक मोहीम..

– केज / जय जोगदंड

– केज पोलीसांची अवैद्य दारू विरोधात धडक मोहीम ;दहा ठिकाणी छापे : ६६ हजाराचा मुद्देमाल केला नष्ट.

केज – पोलिसांनी केज आणि परिसरात दहा ठिकाणी धाडी टाकून देशी दारू आणि हातभट्टी यावर कारवाई करीत सुमारे ६६ हजार रुपयाची मुद्देमाल व दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले.

या बाबतची माहिती अशी की, दि.२६ फेब्रुवारी शुक्रवार रोजी केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांच्या पथकाने पोलीस नाईक अशोक नामदास, अशोक गवळी, धनपाल लोखंडे, महिला पोलीस रुक्मिणी पाचपिंडे, हवालदार बाळकृष्ण मुंडे यांनी शहरातील फुले नगर आणि कदमवाडी, टाकळी, केवड, येवता, नांदुरघाट या ठिकाणी अवैधरित्या चालू असलेल्या हातभट्टी आणि देशी दारू विरोधात कारवाई केली. या दहा ठिकाणी पोलीसांनी धाड टाकून ६६ हजार ३४० रु.प किमतीची गावठी दारू, दारू तयार करण्याचे रसायन व देशी दारू असा मुद्देमाल ताब्यात घेऊन नष्ट केला.

केज पोलीस स्टेशनला मुंबई दारूबंदी कायदा ६५ (ई) नुसार पायल काळे, लताबाई शिंदे, निलावती शिंदे, हरिनाथ काळे, अर्चना काळे, मैनाबाई शिंदे, सोनाली पवार, वसंत काळे, अक्काबाई शिंदे आणि विजयाबाई शिंदे या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीमुळे हातभट्टी आणि अवैद्यरित्या दारू विक्री करणारात दहशत निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.