Home » ब्रेकिंग न्यूज » डीडीआर देशमुख यांचे अभिनंदन – ॲड.अजित देशमुख.

डीडीआर देशमुख यांचे अभिनंदन – ॲड.अजित देशमुख.

डीडीआर देशमुख यांचे अभिनंदन – ॲड.अजित देशमुख.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

बीड – बीडचे प्रभारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर काम करणारे उस्मानाबादचे अधिकारी विश्वास देशमुख यांनी डीसीसी बँकेचा निवडणुकी संदर्भात अत्यंत चोख कामगिरी केली असून जन आंदोलना तर्फे त्यांचा सत्कार केला जाईल, असे जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड अजित देशमुख यांनी म्‍हटले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज पर्यंत एवढी कठोर भूमिका आणि नियमाचे पालन कोणत्याही जिल्हा उपनिबंधकाने केले असेल की नाही ? मात्र विश्वास देशमुख यांनी मात्र बीड जिल्ह्यातील जनतेला निवडणूकीत नियम पाळल्याचे दाखवून दिले आहे.

जिल्हा बँकेत सारख्या सर्व पक्षांची सत्ता असताना आणि सत्तेसाठी सर्व एकत्र येत असताना असा एकदाच अधिकारी नियमांचा बडगा उगारून कामकाज करू शकतो. देशमुख यांनी जिल्ह्यातील जनतेला अत्यंत पारदर्शक कारभार निवडणूक प्रक्रियेत चालू असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे ते कौतुकासाठी पात्र ठरले असल्याचेही ॲड. देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.