Home » माझा बीड जिल्हा » केज येथे रिपाइंचा भूमी अधिकार मोर्चा..

केज येथे रिपाइंचा भूमी अधिकार मोर्चा..

केज येथे रिपाइंचा भूमी अधिकार मोर्चा..

– केज / जय जोगदंड

केज – तालुक्यातील जनतेच्या मागण्या सोडवण्यासाठी केज रिपाइंचा केज तहसील कार्यालावर प्रचंड भूमी अधिकार मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात रिपाइंचे प्रमुख कार्यकर्ते व तालुक्यातील महीलासह नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया आठवले गटाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष संदिपान हजारे यांच्या नेतृत्वाखाली दि.२२ फेब्रुवारी सोमवार रोजी तालुक्यातील जनतेच्या विविध मागण्यासाठी केज तहसील कार्यालयावर प्रचंड भूमी अधिकार मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात आंबेडकर चौकातून मंगळवार पेठे बस स्टँड, शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चातील प्रमुख मागण्या केज तालुक्यात मागासवर्गीय लोक कसत असलेली गायरान जमिन कास्तकऱ्याच्या नावे करण्यात याव्यात. अतिक्रमित जमिनीवरील पिकांना आणि गायरान धारकास संरक्षण द्यावे. महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, संत रोहीदास इ. सर्व आर्थिक महामंडळ व बारा बलुतेदारासांठी सेवा सहकारी संस्था यांना बीड जिल्हा बँकेने दिलेले सर्व कर्ज माफ करावे. त्यांना नवीन कर्ज देण्यात यावे. केज शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा. शहरात स्वच्छ पाणी पुरवठा करावा. शहरातील रस्त्याचे काम जलद गतीने करण्यात यावे.
निराधारांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करावी. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी. शिधा पत्रीका वाटप कराव्यात. वरपगांव येथील गावठाण जमिण खुली करावी. तालुक्यातील दलित स्माशानभुमिवरील अतिक्रमणे तात्काळ हटवावित. स्मशानभूमीसाठी जेथे जागा नसेल तेथे जागा उपलब्ध करून तेथे अंत्यविधीसाठी निवारा शेड बांधून देण्यात यावे. सुशिक्षित बेरोजगारांंना प्रतिमाह ५००० रु. मानधन देण्यात यावे. केज येथील बसस्थानकात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा. यासह अनेक मागण्या घेऊन हा भूमी अधिकार मोर्चा आंबेडकर चौकातून मंगळवारपेठ, बस स्टँड मसर्गकेज तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता.या मोर्चात रिपाइंचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष संदिपान हजारे,
महेंद्र गायकवाड, महेंद्र निकाळजे, भास्कर मस्के, अंबादास तुपारे, रवींद्र जोगदंड, ईश्वर सोनवणे, उत्तम मस्के, दिलीप गाडे, दिलीप बनसोडे, शाहू डोळस, अंकुश गंगावणे, अमोल मस्के, कैलास जावळे, भारत गायकवाड, सुनील हिरवे रमेश निशिगंध, मसू बचुटे, बाजीराव जोगदंड, छत्रभुज हिरवे, नितीन घोडके, ज्ञानोबा आरकडे, संजय शिंदे, सचिन ठोकळ, महादेव गायकवाड, सुशीला ठोकळ, विजमाला हजारे, आम्रपाली मस्के, सुरेखा मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते, महीला व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान या वेळी नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी मोर्चेकऱ्यांचे मागणीचे निवेदन स्विकारले.

Leave a Reply

Your email address will not be published.