Home » माझा बीड जिल्हा » वक्तृत्व स्पर्धेत कु.ईश्वरी गणेश बजगुडे राज्यात तिसरी.

वक्तृत्व स्पर्धेत कु.ईश्वरी गणेश बजगुडे राज्यात तिसरी.

वक्तृत्व स्पर्धेत कु.ईश्वरी गणेश बजगुडे राज्यात तिसरी.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– बक्षिसाच्या रकमेतून केले अनाथ संग्रामला कपडे व साहित्य वाटप.

बीड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती निमित्त हर्षवर्धन पब्लिकेशन व विद्यावर्ता मासिक यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आयोजक प्रा. डॉ. बापू घोलप यांनी काल १९ फेबूरवरी रोजी आपल्या विद्यावार्ता या चॅनल वरती स्पर्धेचा निकाल घोषित केला. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण १४० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. बीड येथील कू. ईश्वरी गणेश बजगुडे वर्ग ८ वा. संस्कार विद्यालय बीड हिने ही या स्पर्धेत सहभागी होवून शिवाजी महाराजांवर आपले मत भाषणांतून व्यक्त केले होते. तीचे अतिशय स्पष्ट व परखड व्यक्तृत्व पाहून प्रेक्षकांच्या भरपूर लाईक व शुभेच्छा येतच होत्या परंतु काल स्पर्धेचा निकाल जाहीर झाला व तीला राज्यात तिसरा क्रमांक मिळाला. मिळालेल्या बक्षिसाची रक्कम आनाथ मुलांच्या शिक्षणासाठी दान करण्याचा संकल्प इश्र्वरीने केला असून शिरूर तालुक्यातील ब्रम्हणाथ येळंब येथील सेवाश्रमातील नुकतेच दाखल झालेल्या चि. संग्राम या ६ वर्षीय आनाथ बालकाला एक ड्रेस, बुट व शालेय साहित्य आश्या स्वरूपाची मदत त्याठिकाणी जावून ईश्वरीने त्याठिकाणी केली. आपल्याला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ही सत्कर्मी लागावी व त्यातून कोणाला तरी मदत किंवा आधार मिळवा यासाठी आज संग्राम सारख्या लहान भावाला मदत बक्षिसाच्या रकमेतून मदत करत आहे. यापुढेही गणेश दादा बजगुडे परिवाराकडून किंवा शिवक्रांती संघटनेच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित आसलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही मदत करू आश्या प्रकारचे कार्य करण्याचा संकल्प तीने यावेळी केला. या सामाजिक कार्याची प्रेरणा व पाठबळ मला वडिलांकडून मिळाले असे ही ती म्हणाली. ईश्वरी बजगुडे ही बीड येथील शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांची मुलगी असून तिच्या या कामगिरी बद्दल राज्यभरातून कैतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.