Home » महाराष्ट्र माझा » पिंपरी बुद्रुक येथे ग्राम कृषी विकास समितीची स्थापना.

पिंपरी बुद्रुक येथे ग्राम कृषी विकास समितीची स्थापना.

पिंपरी बुद्रुक येथे ग्राम कृषी विकास समितीची स्थापना.

– निरा नरसिंहपूर प्रतिनिधी / बाळासाहेब सुतार.

– तळागाळातील गोरगरीब  शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देऊ कृषी सहाय्यक अधिकारी संदीप घुले यांचे उद्गार..

ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे कृषी अधिकारी ग्रामसेवक व ग्राम पंचायत सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत ग्राम कृषी विकास समितीची स्थापना

व जमीन सुपीकता निर्देशांक फलकही ग्रामपंचायत ऑफिस मध्ये लावण्यात आला. त्या फलकावरील जमीन सुपीकता निर्देशांक द्यावयाची खत मात्रा याबाबत कृषी अधिकारी संदीप नारायण घुले व श्री आर बी शिंदे व आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी यावेळी मार्गदर्शन करून माहिती ही सांगण्यात आली. ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक येथे मासिक आठवडा सभेमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापना करण्यात आली.

तसेच विविध शासनाच्या कृषी योजनांची महाडीबीटी शासनाची मूलभूत योजना अर्ज 1 व योजना अनेक याबाबत माहितीही देण्यात आली. ही समिती पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये स्थापन केल्यापासून इथून पुढे  समितीच्या माध्यमातून प्रगतशील शेतकरी महिला बचत गट छोटा शेतकरी पूरक व्यवसाय करणारे शेतकरी तसेच गावातील अल्प व अत्यल्प अल्पभूधारक शेतकरी या सर्वच नागरिकांना शासनाच्या अनेक येणाऱ्या योजनाचीही माहिती मिळणार आहे. कोणता शेतकरी यापासून वंचित राहणार नाही असेही सांगण्यात आले. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना होणारा लाभ व शेतकऱ्यांना फळपिकांना येणारा रोग पिकांची प्रतिकार शक्ती वाढवणे. अल्प व अत्यल्प बुधारक शेतकरी यांना या समिती मार्फत वेळोवेळी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये, पिंपरी बुद्रुक कृषी सहाय्यक संदीप नारायण घुले, नरसिंहपूर कृषी सहाय्यक आर-बी -शिंदे, पिंपरी बुद्रुक गावचे आदर्श पुरस्काराचे मानकरी (ग्रामसेवक) गणेश लंबाते, सरपंच ज्योती  बोडके, उप सरपंच अनुराधा गायकवाड, (सर्व ग्रामपंचायत सदस्य) विद्यादेवी बोडके, भाग्यश्री बोडके, सुनिता शेंडगे, हलिमा शेख, पांडुरंग बोडके, संतोष सुतार, रवींद्र पाटील, या सर्वांच्या उपस्थितीत ग्राम पंचायतीमध्ये मीटिंग कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.