Home » महाराष्ट्र माझा » वंचित/लोकाधिकार आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक.

वंचित/लोकाधिकार आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक.

वंचित/लोकाधिकार आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

जामखेड – दिनांक 12/2/2021 रोजी वंचित बहुजन आघाडी व लोक अधिकार आंदोलन जामखेड तालुक्याच्या वतीने गॅस ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी अॅड.डॉ अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले,

गॅस ग्राहकांची दिवसान दिवस लुटमारी चालूच आहे, व नुकतीच गॅस सिलेंडरची 25 रुपयेनी दरवाढ करण्यात आली आहे, ती तात्काळ शासनाने रद्द करण्यात यावी, व गॅस एजन्सी पासून 5 किलोमीटर अंतरावरती गॅस सिलेंडर मोफत डिलिव्हरी करण्यात यावी, त्याचा कोणत्याही प्रकारचा चार्जेस घेण्यात येऊ नये तसेच गॅस सिलेंडर डिलिव्हरी देताना गॅस सिलिंडरचे वजन करून डिलिव्हरी घरपोच देणे, या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते,

यावेळी या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रा. मधुकर (आबा) राळेभात, नगरसेवक अमित जाधव, नगरसेवक मोहन पवार, ,डवरी गोसावी समाजाचे जामखेड तालुका अध्यक्ष अजिनाथ शिंदे, आदिवासी पारधी समाजाचे नेते विशाल पवार ,द्वारकाताई पवार ,बाळगव्हाणचे उपसरपंच राहुल गोपाळघरे, इत्यादींच्या वतीने या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला,

या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रा. मधुकर (आबा) राळेभात म्हणाले की शासनाने गोरगरीब जनतेचा विचार करावा कारण ग्रामीण भागातील वृक्षतोड बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना जळण म्हणून गॅस घेणे बंधनकारक झाले आहे, त्यामुळे शासनाने या वंचित बहुजन आघाडीने केलेल्या धरणे आंदोलनाचा विचार करावा व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा,

या आंदोलनाच्या वेळी अॅड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या गॅस संबंधी काही निर्णय केंद्राच्या ताब्यात असतात तर काही निर्णय राज्याच्या ताब्यात असतात गरीब कष्टकरी जनतेच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे परंतु हे गॅस एजन्सी जनतेची लूटमार करतात गॅस काढून घेतात गॅस टाकीचे कमिशन घेतले जाते, शासनामार्फत प्रत्येक ग्राहकाच्या घरी गॅस फुकट डिलिव्हरी केली जात असताना सुद्धा प्रत्येक गॅस पाठीमागे 20 रुपये दर लावला जातो साधारणता या जामखेड तालुक्यामध्ये 50 ते 40 हजार गॅस ग्राहक असतील आपण जर विचार केला तर लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो, श्रीमंत ग्राहकांना वाटते वीस रुपये म्हणजे काय गॅस घ्या, परंतु माझ्या गोर गरीब जनतेने काय करायचे याचा विचार प्रशासनाने करावा व ही गॅस एजन्सीकडून होणारी लूटमार थांबून जनतेला चांगली सेवा द्यावी,

यावेळी जामखेड तहसीलदार मा.विशालजी नाईकवाडे साहेब यांनी तात्काळ गॅस एजन्सी धारकां सोबत वंचित व लोकाधिकार आंदोलनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित व प्रशासन यांच्या बरोबर बैठक लावली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन कर्त्यांनी हे आंदोलन मागे घेतले,

यावेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ,वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष योगेश सदाफुले, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतीश पारवे, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, संतोष चव्हाण, राकेश साळवे,वैजीनाथ केसकर, पोपटराव फुले, अभिमान समुद्र, नितिन आहेर, वंचित बहुजन आघाडी तालुका युवा अध्यक्ष मनेश ससाणे, लखन जाधव, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश घायतडक, सूर्यकांत सदाफुले, हरी जाधव, मच्छिंद्र जाधव, विशाल जाधव,अंकुश पवार रवी अंकल घायतडक, संतोष सदाफुले, हरी जाधव, सागर पवार,अक्षय शिरोळे, स्वप्नील शिरोळे देवदैठणचे माजी सरपंच धेडे, रूपाली पारवे, सरपंच तरडगाव संगीता केसकर, नंदा शिरोळे, सुरेखाताई सदाफुले, अश्विनीताई पारवे, शिल्पा पारवे, कल्याण आव्हाड, सुरज सदाफुले, पप्पू राज सदाफुले, कुसुमताई खाडे, सय्यद मेहबुब,उबेद शेख, सय्यद रहेमान, आदी कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी आंदोलन कर्त्यांनचे अरुण डोळस यांनी आभार मानले,

Leave a Reply

Your email address will not be published.