Home » ब्रेकिंग न्यूज » उपविभागीय अधिकार्‍याला लाच घेताना पकडले.

उपविभागीय अधिकार्‍याला लाच घेताना पकडले.

उपविभागीय अधिकार्‍याला लाच घेताना पकडले.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

बीड – माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी अवैध वाळूच्या गाड्या सुरु ठेवण्यासाठी आपल्या चालकामार्फत 65 हजार रुपयांची लाच घेतली. यावेळी चालक काळे यांना माजलगावच्या संभाजी चौकात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर काहीच वेळात गायकवाड यांना देखील त्यांच्या राहत्या घरून एसीबीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही कारवाई जालना एसीबीने केली.
माजलगावात वाळूच्या अवैध वाळुच्या गाड्या चालू ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी 65 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्या उपर जाऊन गायकवाड वाळूची गाडी सुरु होताच ती पकडून पुन्हा तहसील कार्यालयात आणून लावत व ती सोडविण्यासाठी सुमारे दिड ते दोन लाख रुपयांची मागणी करत. याला कंटाळून तक्रारदाराने जालना एसीबी कार्यालयाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार गायकवाड यांनी आज 65 हजार रुपयांची लाच आपल्या चालकामार्फत स्विकारताच चालकास संभाजी चौक येथे रंगेहाथ पकडण्यात आले तर लाचेच्या मागणीची खात्री झाल्यानंतर एसडीएम गायकवाड यांना त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले. या दोघांनाही एसीबीच्या कार्यालयात आणण्याची प्रक्रीया सुरु होती. जालना येथील पथकातील अधिकारी निकाळजे यांच्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.