Home » माझी वडवणी » जि.प.सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांच्या प्रयत्नांना यश..

जि.प.सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांच्या प्रयत्नांना यश..

जि.प.सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांच्या प्रयत्नांना यश..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– अखेर मानव विकास कार्यक्रमांतर्गत वडवणी तालुक्याला न्याय मिळाला..

वडवणी – मानव विकास कार्यक्रमांतर्गत यापूर्वी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.व बोगस बिले पण उचललेली होती. परंतु लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांच्या तत्परतेने त्याला कायमचा आळा बसला आहे. यावरून लक्षात येते की अखेर मानव विकास कार्यक्रमांतर्गत ही निविदा काढून वडवणी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण 23 शाळांमध्ये 39 लक्ष रुपये जवळपास साडेतीन हजार विद्यार्थ्यांना संगणक लॅब स्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग बीड यास भाग पाडले आहे. तालुक्यातील शाळांमध्ये पाच लक्ष रुपयांचे मोफत पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. अकरा लक्ष रुपयांचे विज्ञान साहित्य सुद्धा वाटप होणार आहे. यासाठी सुद्धा प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील ऊस तोड, गरीब होतकरू, कष्टकरी कामगार यांच्या मुलांना खरा न्याय मिळाला आहे. यासाठी वारंवार चिखलबीड जिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे, भाजपा तालुका अध्यक्ष वडवणी, रिपाई आठवले गट तालुका अध्यक्ष वडवणी यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल गोरगरिबांना सर्वसामान्य समाधान व्यक्त केले आहे. गटशिक्षणाधिकारी वडवणी यांच्या माहितीनुसार संगणक ला मंजूर झालेली गावे व शाळा जिल्हा परिषद शाळा बाहेगव्हागण, साळींबा, कन्या शाळा वडवणी, पुसरा, हिवरगव्हाण, पिंपरखेड ,कवडगाव, खळवट लिमगाव, हरिश्चंद्र पिंपरी, चिंचोटी,काडीवडगांव,परडी,लवुळ क्रमांक दोन,देवगाव ,कोठारबन, सोन्नाखोटा, पिंपळटक्का, पिंपळा रुई,चिखलबीड,देवळा, खडकी,मोरवड,उपळी या गावातील शाळांना संगणक लॅब मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्यां अनिता राजाभाऊ मुंडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.