Home » विशेष लेख » खासदारांना भविष्य उज्वल..

खासदारांना भविष्य उज्वल..

खासदारांना भविष्य उज्वल..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

*विकासाच्या राजकारणाशिवाय दुसरा अजिंडा मनातच नाही*

बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांचा आज जन्म दिवस आहे. सुरूवातीलाच त्यांना शुभेच्छा. त्यांचं भावी आयुष्य उज्वल आणि आरोग्य चांगलं लाभो ही जनतेच्या वतीने प्रार्थना. बीड जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात ज्या नेतृत्वाने अवघ्या पाच-सहा वर्षात भगिनी पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली काम करताना सर्वसामान्य जनतेच्या ऱ्हदयात जागा मिळवली. ज्यांच्याकडे केवळ विकासाची दृष्टी असुन गोरगरीब, वंचित, उपेक्षित यांना न्याय देवुन प्रगतीच्या प्रवाहात घेवुन जाण्याची क्षमता आहे. जो प्रश्न कधीच मार्गी लागला नाही त्या रेल्वेचा प्रश्न सोडवुन त्यांनी अलौकिक काम केलं आहे. सेवाभावी वृत्ती आणि शुद्ध कर्म एवढेच नव्हे तर ज्यांच्या पोटात कुठलंही पाप नसुन सकारात्मक राजकारणाची भुमिका घेवुन केवळ विकासाचा अजिंडा मनात ठेवुन त्या दृष्टीने पावलं टाकणाऱ्या खासदार ज्यांचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं. आरोग्याचा प्रश्न असेल किंवा कोरोनासारख्या संकटात ज्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालुन सर्वसामान्य जनतेला मदत केली. ऊसतोड कामगार, शेतकरी, कष्टकरी एवढेच नव्हे तर कुठलंही संकट आलं की, प्रितमताई हजर ही ज्यांची भुमिका आहे त्या खासदारांना राजकारणात निश्चित उज्वल भविष्य असुन केवळ म्हणजे केवळ विकासाचं राजकारण करणाऱ्या खासदारांनी कधी आपला रूबाब दाखवुन सुडाचं राजकारण केल्याचं लक्षात आलंच नाही. देशात एकमेव खासदार असावा ज्यांनी अजुनही कुणावर तरी गुन्हा दाखल करा हे सांगण्यासाठी कुठल्याही ठाण्यात फोन केला अर्थातच मानवतावाद आणि संघटनात्मक पातळीवर काम करणारं हे नेतृत्व आहे.
वाढदिवस यासाठी साजरा करायचा असतो की त्या निमित्ताने मागे वळुन माणुस पाहतो आणि आपल्या जीवनात आत्मचिंतन तथा परीक्षण करण्यासाठी तो दिवस असतो असं किमान आम्ही समजतो. प्रितमताई अचानक राजकारणात आल्या असल्या तरी त्यांचा जन्म हा राजकिय पाळण्यातीलच आहे. पाय जेव्हा रांगत होते तेव्हा स्व.अटलबिहारी वाजपेयी असो किंवा लालकृष्ण अडवाणीजी असो एवढेच काय स्व.प्रमोदजी महाजन असोत. अर्थात राष्ट्रभक्ती आणि मानवतावादाची सावली लहानपणीच अंगावर पडली. कारण स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या त्या कन्या. साहेबांच्या जाण्यानंतर राजकारणातला धाडसी निर्णय कुटुंबाची प्रमुख म्हणुन पंकजाताईनं घेतला आणि बीड लोकसभा निवडणुकीसाठी साहेबांचा वारसदार म्हणुन प्रितमताईंची निवड झाली.अर्थात देशात नंबर एक मताने संसदेत जाण्याचा विश्र्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. डोंगराएवढं दु:ख छातीमध्ये दडवत जिल्ह्याच्या राजकारणाची दोरी हाती आली आणि पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडायला त्यांनी सुरूवात केली. बीड जिल्ह्याच्या राजकारणात कुठल्याही खासदाराने केंद्र सरकारकडुन इतिहासात निधी आणला नाही. तेवढा मोठा निधी खेचुन आणला. ज्यामधुन रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला. बारा पेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यामधुन घालवले ज्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने हा जिल्हा आता देशाच्या नकाशावर आला आहे.वर्षानुवर्षे रेल्वे प्रश्नाचं भिजत घोंगडं जिल्हावासियांना पाहण्याची सवय होती. मात्र आज आलेलं मुर्त स्वरूप त्यामागे खासदाराचं असलेले कठोर परिश्रम जेष्ठ भगिनी पंकजाताई यांचे प्रयत्न आणि मुंडे साहेबांच्या पुण्याईला धावुन आलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यामुळे हे स्वप्न साकार झालं. आज मागच्या सहा वर्षापासुन प्रितमताईला सर्वसामान्य जनता जवळुन पाहत आहे. त्यांचा स्वभाव शांत, मनमिळावु पण साहेबांचा बाणा असल्याने स्वाभिमान पण तेवढाच आहे. विकासाची प्रश्न मार्गी लावताना त्यांची दबंगगिरी जनतेला माहित झाली आहे. देशाच्या संसदेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारं हे नेतृत्व ऊसतोड कामगारांचे प्रश्न असोत किंवा दुष्काळाचे प्रश्न असोत त्यातली सामाजिक संवेदना नेहमीच सिद्ध झाली. केंद्र सरकारकडुन माझ्या जिल्ह्यात योजना आल्या पाहिजेत यासाठी नेहमीचा अट्टाहास हा फायद्याचा ठरतो. मुळात त्यांना दृष्टी विकासाची आहे. दुसरं राजकारण माहितच नाही. त्यामुळे पावलं टाकताना विकासाच्या वर्तुळाशिवाय बाहेर पडतच नाहीत. खरं तर खासदार म्हटलं तर अनेक प्रकारे त्यांचे स्वभाव आणि सुडाची भावना असणारं आपण नेहमी पाहतो. पण प्रितमताई असं नेतृत्व ज्यांनी पाच-सहा वर्षात कुठल्याही पोलीस स्टेशनला साधा फोन केलेला नाही. त्याचं कारण सकारात्मक राजकारणाची दिशा आणि मार्गदर्शन त्यांना पंकजाताईचं नेहमीच मिळतं आणि या भगिनींनी जिल्ह्याची राजकिय संस्कृतीच बदलुन टाकली आहे. कोरोनासारख्या संकटात त्यांची भुमिका अगदी कोवीड वॉर्डात जावुन रूग्णांची भेट त्यांनी घेतली. वेळोवेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेवुन प्रशासकिय यंत्रणा सतर्क ठेवली. काही वर्षापुर्वी त्यांनी जिल्ह्यात सर्वसामान्य रूग्णांसाठी आरोग्याचा महायज्ञ पण केला आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात त्यांच्यामुळे अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागले. ज्यामध्ये एमसीआयच्या जागा शाबुत राहिल्या. एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारकडुन कोरोना संकटात आरोग्य साहित्य पुरवठा झाला. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे म्हणुन त्यांनी मध्यंतरी जिल्हा परिषद शाळांना स्वत: भेटी दिल्या.खासदार निधीतुन मदतही केली. पोहनेरसारख्या ठिकाणी मॉडेल म्हणुन शाळा बंद बांधली. बीड जिल्ह्यातील जनतेवर निसर्गाचं संकट नेहमीच उभा राहतं. कधी पाऊस जास्त तर कधी कोरडा दुष्काळ मात्र संकटात शेतकऱ्यांच्या बांधावर पहिला पाऊल कुणाचा पडला?असं जर विचारलं तर प्रितमताईचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आज बीड जिल्ह्यातील लोकांची मनं त्यांनी स्वकर्तृत्वाने जिंकली असुन राजकारणात कितीही उलथापालथ झाल्या तरी त्यांना उज्वल भविष्य आहे हे मात्र नक्की.एक खासदार कसा असावा? हा सवाल जेव्हा सामान्य जनतेला विचारला जाईल तेव्हा प्रितमताईचं नाव 90 टक्के जनतेमधुन पुढे येईल अशी परिस्थिती आहे. पावलोपावली त्यांना पंकजाताईचं मार्गदर्शन प्रत्येक प्रश्नावर मिळत असतं. आज रेल्वेच्या विकास कामाची गती जेव्हा कमी झाली एवढंच नाही तर राज्य सरकारनं सहभाग दिला नाही. अशा वेळी प्रितमताईंनी थेट रेल्वे मंत्रालयाची दारे ठोठावली आणि चक्क 527 कोटीचा निधी मंजुर करून आणला. ही गोष्ट कमी नाही. नेतृत्वामध्ये हिंमत असेल तर विकासाच्या प्रश्नावर काही पण करू शकतो अशी परिस्थिती नेतृत्वात असते. प्रितमताईच्या लोकप्रियतेचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक गोष्ट निश्चित लक्षात येते की त्यांच्या एकुणच देहबोलीमध्ये कुठलाही रूबाब नसतो. प्रत्येकाची विचारपुस करणे आणि जनतेच्या सुखदु:खात धावुन जाणे. शांत स्वभावाने अनेकदा वाट पाहणे या प्रचलित स्वभावातुन त्यांनी जिल्हावासियांची मने जिंकली आहेत. प्रशासकिय यंत्रणेकडुन काम करून घेण्याची त्यांची हातोटी आगळीवेगळी असुन एक हात में जुता और एक हात मे गीता या आयुधाचा वापर निश्चितच त्या करतात. कधी कधी त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते की पर्वताएवढं दु:ख डोळ्यात दिसतं. क्षणोक्षणी साहेबांच्या आठवणीनं त्या घाय्ााळ असतात. पण लोकांचं प्रेम व साहेबानंतर आलेली जबाबदारी त्यातली कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर होतात. म्हणुन सर्वकाही विष गिळंकृत केल्यासारखं मागे पाडतात आणि केवळ विकासाचं राजकारण करत बीड जिल्ह्यातील जनतेची सेवा करतात. वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सद्गुण व त्याची चर्चा निश्चित करावी लागतेच. पंकजाताई असो किंवा प्रितमताई या भगिनींनी बीड जिल्ह्यासाठी खुप काही केलेलं आहे आणि करत आहेत. पंकजाताईच्या काळात विकासाचा महापुर बीड जिल्ह्यातील जनतेने पाहिलेला आहे. बाकी काही असलं तरी अशा या लाडक्या नेतृत्वाला राजकीय क्षेत्रात उज्वल भविष्य असुन कदाचित पुढचा वाढदिवस वेगळ्या भुमिकेत साजरा करण्याचं भाग्य जिल्हावासियांना मिळु शकतो अशी सदिच्छा निमित्ताने देणं उचित ठरेल.

– राम कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published.