Home » माझी वडवणी » पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना यश !

पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना यश !

पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना यश !

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– परळीच्या भाविकांना आता रामेश्वरमलाही जाता येणार ; तीर्थक्षेत्र यात्रा स्पेशल ट्रेन गुरूवारी वैद्यनाथाच्या भूमीत.

परळी – शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना आता श्रीक्षेत्र रामेश्वरमलाही रेल्वेने जाता येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तीर्थक्षेत्र यात्रा स्पेशल ट्रेन रेल्वे मंत्रालयाने वैद्यनाथ ज्योतिर्लिंगापर्यंत विस्तारित केली आहे. येत्या १८ तारखेला पहाटे म्हणजे गुरूवारी हया स्पेशल ट्रेनचे परळीत आगमन होणार असून भाविकांत आनंद व्यक्त होत आहे.

 

परळीचे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे देशातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक आहे. रेल्वे मंत्रालयाच्या आयआर सीटीसी ने ज्योतिर्लिंग यात्रा सुरू केली असून त्यासाठी विविध ठिकाणांहून प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने विशेष ट्रेन सुरू केल्या आहेत. सुरवातीला या यादीत परळी ज्योतिर्लिंगाचा समावेश नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांना भेटून ही स्पेशल ट्रेन परळी पर्यंत आणावी अशी मागणी केली. खासदार डाॅ. प्रीतमताई यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवले तर पंकजाताई यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन या यादीत परळीचा समावेश करण्याची मागणी केली होती, त्यांच्या या पाठपुराव्या नंतर रेल्वे मंत्रालयाने हया विशेष ट्रेनला परळीपर्यंत परवानगी दिली.

 

*गुरूवारी येणार स्पेशल ट्रेन ; परळीत नऊ तास थांबणार !*

————————-

दक्षिण मध्य रेल्वेची ही तीर्थक्षेत्र यात्रा विशेष रेल्वे गाडी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१० वा. राजकोट (गुजरात) येथून निघून १६ ला दुपारी २ वा. नाशिक रोड, १७ तारखेला संध्याकाळी ७.३० वा. औरंगाबाद आणि १८ तारखेला पहाटे ४ वा. परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे येणार आहे. परळी येथे नऊ तास ही रेल्वे थांबणार असून त्यानंतर दुपारी १ वा. परळी येथून निघून २० तारखेला ही रेल्वे श्रीक्षेत्र रामेश्वरम येथे पोहोचणार आहे. स्पेशल ट्रेन सुरू केल्याबद्दल शहरात आनंद व्यक्त होत असून भाविक भक्त व प्रवाशांनी पंकजाताई मुंडे, खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

••••

Leave a Reply

Your email address will not be published.