Home » माझा बीड जिल्हा » तारामती बचुटे यांचे निधन.

तारामती बचुटे यांचे निधन.

तारामती बचुटे यांचे निधन.

 – केज / जय जोगदंड 

 केज तालुक्यातील साळेगाव येथील तारामती सखाराम बचुटे वय ६७ वर्ष यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

दि. १४ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी ७:०० वा च्या दरम्यान तारामती बचुटे वय ६८ वर्ष या घरात पलंगावर झोपलेल्या असताना हृदय विकाराचा तिव्र झटका आला. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यावर साळेगाव येथील सार्वजनिक स्मशानभूमीत बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. तारामती बचुटे या कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय सदस्य व कामगार चळवळीचे नेते दिवंगत कॉ. बाबासाहेब सरवदे यांच्या सासूबाई होत्या. तसेच साळेगावच्या पहिल्या महिला सरपंच दैवशाला सरवदे यांच्या आई होत्या. त्यांच्या पश्चात ज्योतिराम, मोतीराम ही दोन मुले व सरोज सरवदे, दैवशाला सरवदे या दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.