Home » महाराष्ट्र माझा » केज तालुक्यात खळबळजनक घटना !

केज तालुक्यात खळबळजनक घटना !

केज तालुक्यात खळबळजनक घटना !

केज /जय जोगदंड

– केज-साळेगाव दरम्यान केज-कळंब रोडवर गव्हाच्या शेतात एका तरुणांचा संशयास्पद मृत्यू

– केज तालुक्यात केज कळंब रोडवर एका तरुणांचा गव्हाच्या शेतात.

या बाबतची माहिती अशी की, केज कळंब रोडवर साळेगाव ते माळेगाव दरम्यान तुकाराम गुंठाळ यांच्या सर्व्हे नं. ४१ मधील पेरूच्या बागे जवळ गव्हाच्या शेतात एक २८ वर्ष वयाच्या इसमाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. तुकाराम गुंठाळ हे सकाळी शेतात गेले असता त्यांना गव्हाच्या पिकात एका तरुणांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती जवळच्या युसुफवडगाव पोलीस स्टेशनला माहिती देताच वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे व विजय आटोळे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक पालवे आणि सीमा कोळी यांच्यासह बाळासाहेब ढाकणे, खनपटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे वैभव राऊत व पप्पू अहंकारे हे घटनास्थळी हजर झाले. दरम्यान मयताच्या मोबाईलवरुन त्याची ओळख पटली असून हा तरुण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील सावरगाव भागातील राहणारा असून त्याचे नाव लखन महादेव सोनवणे असे आहे. तो इमारतींना रंग देण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. प्रेताची व घटना स्थळाची माहिती घेतली असता त्याच्या डोक्यात मागील बाजूने मार लागलेला असून पाठीवर आणि मानेवर पुसटश्या मारहाणीच्या खुणा दिसून येत आहेत. तसेच कानातूनही रक्त आलेले होते. प्रेताचीच्या उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला असून हा घात की अपघात ? याचा तपास पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.