Home » महाराष्ट्र माझा » ते..निर्बंध तात्काळ हटवा -हनुमंत तांगडे पाटील.

ते..निर्बंध तात्काळ हटवा -हनुमंत तांगडे पाटील.

ते..निर्बंध तात्काळ हटवा -हनुमंत तांगडे पाटील.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– विश्व मराठा संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

बुधवारी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून शिवजयंती संदर्भात एक परिपत्रक काढण्यात आले या परिपत्रकामध्ये कोरोणाच्या पार्श्वभूमीमुळे शिवजयंती फक्त दहा लोकांनी एकत्र येऊन करावी असे नमूद करण्यात आले आहे.
साहेब आम्ही शिवभक्त वर्षाचे 364 दिवस 19 फेब्रुवारी म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती ची वाट पाहत असतो पण बुधवारी काढण्यात आलेल्या परिपत्रकामुळे शिवभक्तांना मध्ये तीव्र नाराजी आहे.
साहेब कोरोना ची पार्श्वभूमी असताना पार्श्वभूमी असताना असताना पदवीधर निवडणूक होऊ शकते मोठमोठया सभा होऊ शकतात, ग्रामपंचायत निवडणुका होऊ शकतात ,आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावर होऊ शकतं तर मग शिवजयंती का होऊ शकत नाही
मुख्यमंत्री साहेब आपल्याकडे शिवशाही चे मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते आणि आपल्याच सरकार कडून असे परिपत्रक निघतात तर आम्ही शिवभक्तांनी काय समजायचे शिवभक्तांनी काय समजायचे खरंच शिवशाही सरकार आहे का?
असे पत्र विश्व मराठा संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत तांगडे पाटील यांनी मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे पाठवले पाठवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.