Home » महाराष्ट्र माझा » सौ.राजकुमारी मोहिते;साधू देवकर यांच्या निवडी.

सौ.राजकुमारी मोहिते;साधू देवकर यांच्या निवडी.

सौ.राजकुमारी मोहिते;साधू देवकर यांच्या निवडी.

निरा नरसिंहपुर / बाळासाहेब सुतार

टणु तालुका इंदापूर येथील 2021 ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये  टणु गावच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड करण्यात आली.भर्तीनाथ ग्राम विकास पॅनेल पुरस्कृत मधून विजय झालेले पाच उमेदवारांपैकी नूतन सरपंच सौ. राजकुमारी सागर मोहिते यांची निवड झाली तर उपसरपंच पदी साधू रघुनाथ देवकर यांची निवड करण्यात आली .

या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हुणून उदयसिंग एम. कदम, मंडळ अधिकारी बावडा , ग्रामसेवक बिराजदार तसेच  बी. एल. राऊत उपस्थित राहुल टणु येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे कामकाज पाहिले.

नूतन सरपंच सौ. राजकुमारी सागर मोहिते यांनी सरपंच पदाचा पदभार घेतल्यानंतर पुढे म्हणाल्या की मला टणू गावातील मतदार बंधू-भगिनींनी मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला आपल्या गावची सरपंच केल्याबद्दल सर्वच मतदारांचे मी आभार मानत आहे. इथून पुढे गोरगरीब शेतकरी कष्टकरी मजूर शासनाच्या अनेक येणाऱ्या योजनेतून एकही ग्रामस्थ वंचित राहू देणार नाही. नूतन सरपंच राजकुमारी मोहिते यांचे निवडीनंतर  उदगार.

ग्रामपंचायत निवडीसाठी नूतन सरपंच उपसरपंच व सदस्य – सरपंच राजकुमारी सागर मोहिते, उपसरपंच साधू रघुनाथ देवकर, वैभवी तेजस मोहिते , सारिका दिलीप लावंड, तेजस मोहन मोहिते, हे नूतन सदस्य उपस्थित राहीले तसेच सरपंच पदाच्या निवडणुकी साठी या वेळी गावातील ग्रामस्थ – (संचालक) प्रकाश मोहिते, सुबास मोहिते, (पोलीस पाटील) शरद जगदाळे, नाथाजी मोहिते, तानाजी जगदाळे, दादा पाटील समीर मोहिते, अमोल मोहिते,(मा.चेअरमन) प्रकाश मोहिते, सतीश बळते, बाबासाहेब चव्हाण, सुहास जगदाळे, बलभीम चव्हाण, विलास मोहिते, दत्तू मोहिते, सतीश जगताप,

राजेंद्र मोहिते, नवनाथ मोहिते, नाना पाटील, नाथाजी मोहिते, तानाजी जगदाळे, कांतीलाल मोहिते,   श्रीधर जगदाळे, हे टणु येथील सर्वच मान्यवर व ग्रामस्थ सरपंच पदाच्या निवडीसाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.