Home » माझी वडवणी » विस्कळीत पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा – शेषेराव जगताप.

विस्कळीत पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा – शेषेराव जगताप.

विस्कळीत पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा – शेषेराव जगताप.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– वडवणीत धरण उशाला आणि कोरड घशाला
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा – शेषेराव जगताप

वडवणी – वडवणी शहरातील नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून पाण्याविना नाहकपणे त्रास सहन करावा लागत असून नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील पंधरा दिवसांपासून पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शहरातील बऱ्याच भागात पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली असून तरी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने वडवणी शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करावा अशी मागणी नगरसेवक शेषेराव जगताप यांनी वडवणी नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाने वडवणी शहरातील व नगरपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी उर्ध्व कुंडलिका प्रकल्प सोन्नाखोटा या ठिकाणाहून अंदाजे २२ ते २५ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. ही योजना आजमितीला पूर्णत्वास जात आहे. या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून वडवणी शहरातील नागरिकांनी प्रत्येक घरी तब्बल २ हजार रुपये स्वतः खर्च करून प्रत्येकी नळ कनेक्शन घेतलेले असून याचं नवीन पाईपलाइनव्दारे शहरात पाणीपुरवठा देखील मागील काही दिवसांपूर्वी होत होता. परिणामी वडवणी शहरातील नागरिकांना एक सुखद अनुभव व पाण्याची चिंता मिटली अशी भावना निर्माण झाली होती. परंतु वडवणी नगरपंचायतच्या ढिसाळ कारभार व हलगर्जीपणामुळे पुनश्च एकदा वडवणीकरांना पाण्याविना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी सदरील पाईपलाईन फुटली असून या मागील १५ दिवसांपासून शहरातील बऱ्याच भागात पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी अवस्था जनतेची झालेली आहे. वडवणी नगरपंचायतला प्रशासक गैरहजर असतात व मुख्याधिकारी देखील रजेवर गेलेले आहेत. नगरपंचायत प्रशासनाचे दोन्ही जबाबदार अधिकारी गैरहजर असल्याने अशा परिस्थितीत वडवणी नगरपंचायतचे कर्मचारी हे जनतेला उडवाउडवीची उत्तरे देत असून यामुळे नागरिकांनी नेमकी दाद मागायची तरी कोणाकडे हा मोठा गंभीर प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. तरीही वडवणी नगरपंचायत प्रशासनाने येत्या २ दिवसांत संपूर्ण शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा शहरातील सर्व नागरिकांना सोबत घेवून लोकशाही मार्गाने वडवणी नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक शेषेराव जगताप यांनी प्रशासक व मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय वडवणी यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.