Home » माझी वडवणी » वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे असे आहे आरक्षण

वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे असे आहे आरक्षण

वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे असे आहे आरक्षण

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

वडवणी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.खालील गावांमध्ये असे सुटले आरक्षण

वडवणी तालुक्यातील ३५ पैकी २९ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत
आज ५ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १ वाजता येथील तहसील कार्यालयाच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.यामध्ये ओबीसी महिलांसाठी लोनवळ बाबी,हिवरगव्हाण,पिंपळा रुई,कान्हापुर,देवळा ही पाच गावे आरक्षित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ओबीसी सर्व साधारणसाठी पिंपरखेड,उपळी,खडकी,
खापरवाडी ही चार गावे आरक्षित करण्यात आली आहेत.ओपन महीलांसाठी देवडी,केंडेपिंप्री,
साळींबा,पुसरा,तिगांव,चिंचाळा,सोन्नाखोटा,रुई (पिंपळा),चिंचवडगांव,दुकडेगांव ही दहा गांवे आरक्षित करण्यात आली आहेत.त्याचप्रमाणे ओपन सर्व साधारण साठी चिंचोटी,मोरवड,पिंपळटक्का,
मोरेवाडी,परडी माटेगांव,चिखलबीड,कोठारबन,
खळवट लिमगांव, देवगाव,कवडगांव ही दहा गांवे आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्याचप्रमाणे ३५ पैकी ०६ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण एस्सी / एस.टी साठी राखून ठेवण्यात आलेले आहे. या ०६ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणा मध्ये हरिश्चंद्र पिंप्री,चिंचवण,कुप्पा,
काडीवडगाव,बाहेगव्हाण,ढोरवाडी या सहा ग्रामपंचायत चा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.