Home » माझा बीड जिल्हा » ११४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत

११४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत

११४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत

केज / जय जोगदंड

केज तालुक्यातील सन २०२० ते २०२५ या  कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ११४ सरपंच पदाची सोडत केज येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. ११४ ग्रामपंचायतीच्या सरपंचापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे ७ डिसेंबर रोजीचे पूर्वीचे आरक्षण कायम ठेवून इतर मागास प्रवर्ग व  महिलांसाठी ८३ पदे ही विविध प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.

केज तालुक्यात सन २०२० ते २०२५ दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचतीच्या निवडणुकातील सरपंच पदांच्या आरक्षणनाची सोडत दि. ७४ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० वा केज तहसिल कार्यालयात तहसीलदार मेंढके यांच्या आदेशा नुसार काढण्यात आली. या वेळी प्रभारी तहसीलदार लक्ष्मण धस, नायब तहसीलदार सुहास हजारे, अव्वल कारकून पठाण, मन्मथ पटणे हे उपस्थित होते.

अनुसूचित जातीच्या प्रर्वगासाठी पूर्वी ७ डिसेंबर रोजी काढलेली पूर्वीची एकूण १८ पदे व अनुसूचित जमातीसाठी २ पदे आरक्षित झाली होती. ती अशी आहेत.
अनुसूचित जातीसाठी SC- १८)
अनुसुचित जातींच्या महिलांसाठी जिवाचीवाडी, बोबडेवाडी, राजेगाव, सारणी (सांगवी), दरडवाडी, घाटेवाडी, काशीदवाडी, गप्पेवाडी/नामेवाडी, आंधळे तर अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या प्रवर्गासाठी दैठणा, लिंबाचीवाडी, जोला, डोणगाव, पिट्ठीघाट, सावळेश्वर, मुंडेवाडी, शिरपुरा सातेफळ आरक्षण पडले आहे.

(अनुसूचित जमाती ST- २)
अनुसूचित जमातीच्या महिला करीता वरपगाव/कापरेवाडी तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या प्रर्वगासाठी रामेश्वरवाडी/ढाकणवाडी आरक्षित आहेत.

( नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC -३१)
नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी
आनेगाव, कोरडेवाडी, सांगवी-सारणी, सारुळ, सुर्डी, बेलगाव/केळगाव, देवगाव, जाधवजवळा, सोनिजवळा, धर्माळा, शिरुरघाट,/गद

Leave a Reply

Your email address will not be published.