Home » माझी वडवणी » वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत.

वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत.

वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

वडवणी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण उद्या जाहीर होणार असल्याची माहिती वडवणी तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आली.

वडवणी तालुक्यातील ३५ पैकी २९ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत ही दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ ऐवजी दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी म्हणजेच उद्या दुपारी १ वाजता येथील तहसील कार्यालयाच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले.वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण गेल्या दिनांक ७ /१२/२०२० रोजी जाहीर करण्यात आले होते. मात्र ग्रामविकास मंत्रालयाने ते आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे आता नव्याने उद्या वडवणी तालुक्यातील ३५ पैकी २९ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे. प्रत्यक्षात दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सदर आरक्षण सोडत होणार होती.परंतुमाजलगाव तहसील कार्यालयाच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या कडे वडवणी तहसील कार्यालयाचा पदभार असल्यामुळे एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी तहसीलदार आवश्यक असल्याने ते शक्य नव्हते.याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वडवणी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण ५ फेब्रुवारी २०२१ रोजी म्हणजेच उद्या घेण्यात येणार आहे. वडवणी तालुक्यातील ३५ पैकी २९ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत ही उद्या होणार असुन ३५ पैकी ०६ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण एस्सी / एस.टी साठी राखून ठेवण्यात आलेले आहे. या ०६ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणा मध्ये हरिश्चंद्र पिंप्री,चिंचवण,कुप्पा,काडीवडगाव बाहेगव्हाण,ढोरवाडी या सहा ग्रामपंचायत वगळून उर्वरित २९ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.