Home » ब्रेकिंग न्यूज » पंकजाताई सह प्रितमताई उद्या गहिनीनाथ गडावर.

पंकजाताई सह प्रितमताई उद्या गहिनीनाथ गडावर.

पंकजाताई सह प्रितमताई उद्या गहिनीनाथ गडावर.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

– संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थिती.

बीड – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे उद्या शुक्रवारी गहिनीनाथ गडावर येणार आहेत. थोर संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास त्या उपस्थित राहणार आहेत.

वारकरी संप्रदायातील थोर संत वै. वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा उद्या गहिनीनाथ गडावर संपन्न होत आहे, यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यतिथीला गडावर येण्याची लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची परंपरा पंकजाताई मुंडे यांनी देखील पुढे जोपासली असून दरवर्षी त्या दर्शनासाठी गडावर येतात. एक भक्त म्हणून गडावर विविध विकास कामासाठी त्यांनी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी दिला होता. उद्या सकाळी 11 वाजता पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांचे गडावर आगमन होणार असून दर्शन व किर्तनाच्या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले.
••••

Leave a Reply

Your email address will not be published.