ना.धनंजय मुंडे शुक्रवारी गहिनीनाथगडावर करणार महापूजा.
– डोंगरचा राजा / ॲानलाईन.
– संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास राहणार नियमितपणे उपस्थित.
– बीडमध्ये घेणार जनता दरबार.
बीड – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे हे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे येऊन संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित महापूजेस (शुक्रवार दि. ०५) उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक वर्षे ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. यावेळी गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ७.०० वा. या महापूजेचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर ना. मुंडे हे याच परिसरातील श्री क्षेत्र हनुमानगड येथेही दर्शनासाठी जाणार आहेत.
त्यानंतर दुपारी २.०० वा. बीड शहरातील डीपी रोड येथील डॉ. गणेश राऊत यांच्या श्री.विश्ववेद अमृत चिकित्सालय या आयुर्वेदिक दवाखान्याचे उदघाटन मंत्री महोदयांच्या हस्ते होणार असून, दुपारी अडीच वाजल्यापासून ते राष्ट्रवादी भवन, बार्शी रोड बीड येथे जनता दरबार उपक्रमांतर्गत नागरिकांच्या भेटींसाठी उपलब्ध असतील.
तद्नंतर बार्शी रोड येथील भगवानबाबा प्रतिष्ठान येथे भेट व काही नियोजित भेटीगाठी आटोपून ते परळीकडे रवाना होणार असल्याचे ना. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.