Home » महाराष्ट्र माझा » दिव्यांग कायद्याची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी.

दिव्यांग कायद्याची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी.

दिव्यांग कायद्याची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्तर समितीची बैठक संपन्न.

बीड – राष्ट्रीय न्यास अधिनियम १९९९ अंतर्गत स्थानिक स्तर समिती (मतिमंद मुलांच्या पालकत्वाबाबत) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष स्थानिक स्तर समिती यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेली असून या समितीमध्ये सहाय्यक सदस्य म्हणून पोलीस अधिक्षक,जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा सकारी वकील तसेच जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांचा प्रतिनिधी चा समावेश आहे.या स्थानिक स्तर समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दि.३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वा.संपन्न झाली.अशी माहिती दिव्यांग हितार्थ स्थानिक स्तर समितीचे सदस्य तथा शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे.
राष्ट्रीय न्यास अधिनियम १९९९ हा कायदा केंद्र शासनाने दिव्यांग (सेरेब्रल पाल्सी,मतिमंद,मेंदूचा पक्षाघात आणि आत्ममग्न) व्यक्तींचे कायदेशीर पालकत्व घेण्यात पारित केलेला आहे.या अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.या अधिनियमाच्या कलम १३ नुसर जिल्हास्तरावर स्थानिक स्तर समिती (दिव्यांग व्यक्ती) स्थापन करण्यात आलेली असून या समितीचे अधिनियमातील कलम १३(२)(ए) नुसार स्थानिक स्तर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत.कायद्यातील कलम १४ नुसार कायद्यांतर्गत अभिप्रेत असलेले कार्य व काम समिती पार पडेल.
या कायद्याचा मुख्य हेतू दिव्यांग व्यक्तींना समान संधी हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अन्वये समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामुख्याने उद्देश आहे.
यावेळी बैठकीस स्थानिक स्तर समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी,जि.प.बीड डाँ.सचिन मडावी,जिल्हा शल्यचिकित्सक डाँ.सुर्यकांत गिते,संवेदना संस्था लातूरचे प्रतिनिधी लामजणे व्यंकट,सदस्य राजेंद्र लाड,विश्वंभर चौधरी,सहाय्यक सल्लागार भिकाणे,विजय पांडव,विधी सेवा प्राधिकरण प्रतिनिधी उपस्थित होते.
तद्नंतर शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हा बीड च्या वतीने नुतन जिल्हाधिकारी तथा कर्तव्यदक्ष अधिकारी रविंद्र जगताप यांचे मनस्वी अभिनंदन करण्यात येवून संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यात दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ ची सुयोग्य पद्धतीने कडक अंमलबजावणी करण्यात यावी व दिव्यांग कायद्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांची ४% पदोन्नती तात्काळ करण्यात यावी यासंदर्भान्वये निवेदन देण्यात आले.या निवेदनावर चर्चा करतांना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी म्हटले की,दिव्यांग कायदा २०१६ ची बीड जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्यात येईल तसेच दिव्यांग कायद्यातील तरतुदीनुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात येईल असेही शेवटी रविंद्र जगताप यांनी आश्वासन दिले.दिव्यांग संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड व जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या दिव्यांगाप्रती असलेल्या सकारात्मक बाबींचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.