Home » देश-विदेश » महाजन – मुंडे यांची नावे थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करा – अर्जुन गिते

महाजन – मुंडे यांची नावे थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करा – अर्जुन गिते

महाजन – मुंडे यांची नावे थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करा – अर्जुन गिते

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

भारतीय राजकारणातील आधुनिक चाणक्य स्व. प्रमोद महाजन व लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची नावे थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात यावीत अशी मागणी महाजन-मुंडे विचारमंच व महाजन-मुंडे परिवार महाराष्ट्र राज्याचे अर्जुन गीते यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे मेलव्दारे निवेदन पाठवून केली आहे.

 

निवेदनात पुढे म्हटले आहे की हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत राष्ट्र सेवेत व लोकसेवेत आपले आयुष्य वेचणारे दिवंगत स्व. प्रमोद महाजन व दिवंगत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे या थोर व्यक्तींनी राज्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या गौरवपूर्ण समावेश व उल्लेख करणे तितकेच गरजेचे आहे. सामान्य प्रशासन विभागाने राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींची जयंती व पुण्यतिथी राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येते.तसेच मंत्रालय शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरे करायच्या जयंती राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादी जारी केली आहे. म्हणून 41 थोर पुरुषांच्या यादीत 14 जानेवारी च्या सुधारित यादीत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे व हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नावे शासन निर्णया नुसार सामान्य प्रशासन विभागाने समाविष्ट केले आहेत. तरी महाराष्ट्रातील तमाम महाजन मुंडे यांच्या वर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे की, दिनांक 23 जानेवारी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी स्व.प्रमोद महाजन यांनी अंबेजोगाई या शहरातुन येऊन राष्ट्रीय स्तरावर काम केले आहे.तसेच नाथ्रा तालुका परळी या छोट्याशा गावातून येऊन स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी 40 वर्षे संघर्ष करुन गोरगरीब, ऊसतोड मजूर, वंचित व बहुजन समाजातील घटकांसाठी आपले सर्व आयुष्य वेचले.अशा दोन्ही व्यक्तींचा समावेश थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करावा अशी मागणी देखील या निवेदनात अर्जुन गिते यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.