प्रा.सोमनाथ बडेंचा अनोखा उपक्रम.
– डोंगरचा राजा / ॲानलाईन.
वड़वणी – संपुर्ण देशात कोरोना महामारिने थैमान घातले. जुलै-ऑगस्ट मधे कोरोनाने गावागावात शिरकाव केला. जनता भयभित झाली. कोणीच कुणाच्या मदतीला जात नव्हते. ऐवढेच नव्हे तर वड़ीलांना अग्नीड़ाग देण्यास मुलगाही जात नव्हता अशा भिषण परिस्थीतीत वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे ड़ाॅक्टर,नर्स यांनी स्वतःची व कुटूबांची पर्वा न करता कोविड़ रूग्णांच्या मदतिला धावुन आले. तुटपुंज्या व्यवस्थेवर कधी ऑलोपाॅदीचा तर कधी आयुर्वेदाचा आधार घेत कोरानाग्रस्त निगेटिव्ह करत रूग्णांना धिर दिला. जिल्हातील शासकिय व खाजगी प्राॅक्टीस करणार्या ड़ाॅक्टोरांनी कोरोनावर नियंत्रण मिळवत म्रत्यदरही कमी केला. कोरोना काळात देवाच्या रूपाने ड़ाॅक्टोर दिसले. अनेकांचे प्राण वाचवणार्या ड़ाक्टोरांचा मकरध्वज शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. सोमनाथ बड़े यांनी सन्मान करत गोरक्षनाथ विद्यालय ढेकणमोहा येथे ड़ाॅ. सचिन आंधळकर( वैद्यकीय अधिकारी जिल्हा रूग्णालय बीड़)याच्या हस्ते 72 व्या प्रजासत्ताक दिना निमीत्त ध्वजारोहन करण्यात आले यावेळी ड़ाॅ अमित काळे,ड़ाॅ किरण सवासे यांचा गौरव करण्यात आला तर भगवानबाबा विद्यालय चिचंवण येथे ड़ाॅ अर्चनाताई करमाळकर ,परिचारीका मुंड़े ताई यांच्या हस्ते ध्वजारोहन करत ,ड़ाॅ करमाळकर,कोविड़ सेटंरचे इन्चार्ज ड़ाॅ नाईकनवरे,लाॅब टेक्नीशीयन पवार,वार्ड़बाॅय शशिकांत चिलगर,लहु खारगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी
मकरध्वज शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. सोमनाथ बड़े. सरपंच प्रकाश ठाकुर.प्राचार्य चाटे सर,पर्यवेक्षक एम.एन.वाघमारे,उपप्राचार्य सातपुते सर, ग्रांमपंचायत सदस्य. पोलीस पाटील व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन क्रिड़ा शिक्षक थापड़े सर,चौरे सर यांनी केले. तर ड़ि. एस.मुंड़े यांनी सुत्रसंचालन केले. व चिचंवण येथे संस्थेचे अध्यक्ष आसारामजी बड़े,मयुर बड़े,सरपंच राम मात्रे,उपसरपंच बालासाहेब बड़े,मुख्याध्यापक सिरसट.पर्यवेक्षक राजेभाउ बड़े. क्रिड़ा शिक्षक महादेव रक्टे,नकाते सर, सह ग्रामस्थ,विद्यार्थी,शिक्षक पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.
———————————————–
—–चौकट—–‘
म्रत्यु पावलेल्या रूग्नांच्या आठवणीने वेदना होतात.
—ड़ाॅ सचिन आंधळकर
—————————————————-
कोरोना महामारिने बीड़ जिल्हात उद्रेक माजविला. रूग्न बरे करण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करत कोरोना आटोक्यात आणला. पण काही रूग्न निगेटिव्ह करण्यास करण्यास आम्ही अपयशी ठरलो. दुरूस्त झालेल्या रूग्नाचां आनंद आहेच पण आमच्या ड़ोळ्या समोर म्रत्यु पावलाल्या रूग्नांच्या आठवणीने वेदना होतात. म्हणत गहिवरले,आम्ही केलेल्या कामाची नोंद घेत आमचा सन्मान केल्या बद्धल प्रा.सोमनाथ बड़े सह संस्थेचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यावर कोरीना नियमाचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला.