Home » महाराष्ट्र माझा » पंकजाताई मुंडे यांनी केले खोसे,फड,सारडा, बांगड,बागमारे कुटुंबियांचे सांत्वन.

पंकजाताई मुंडे यांनी केले खोसे,फड,सारडा, बांगड,बागमारे कुटुंबियांचे सांत्वन.

पंकजाताई मुंडे यांनी केले खोसे,फड,सारडा, बांगड,बागमारे कुटुंबियांचे सांत्वन.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

परळी – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील खोसे, सारडा, बांगड व ग्रामीण भागातील फड, बागमारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले.

भाजप सोशल मिडियाचे पदाधिकारी विजयकुमार खोसे यांच्या मातोश्री मंदाबाई खोसे, नवगण काॅलेजचे प्राचार्य आर. एस. बांगड यांच्या पत्नी सुशीलाबाई बांगड, प्रतिष्ठित व्यापारी रामेश्वर सारडा तसेच धर्मापूरीचे उप सरपंच विश्वनाथ बागमारे यांच्या मातोश्री शिवनंदा बागमारे व भतानवाडी येथील बामाजी फड यांचे विविध कारणांमुळे नुकतेच दुःखद निधन झाले. पंकजाताई मुंडे यांनी आज या सर्वांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले व धीर दिला.

भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, गणेश कराड, बिभीषण फड, उमेश खाडे आदी यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
••••

Leave a Reply

Your email address will not be published.