Home » विशेष लेख » उसाचे बिल बँकेत वर्ग – चेअरमन धैर्यशील सोळंके यांची माहिती.

उसाचे बिल बँकेत वर्ग – चेअरमन धैर्यशील सोळंके यांची माहिती.

उसाचे बिल बँकेत वर्ग – चेअरमन धैर्यशील सोळंके यांची माहिती.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याकडून चालू हंगामातील 15 जानेवारी अखेर गाळप केलेल्या उसाचे बिल बँकेत वर्ग – चेअरमन श्री धैर्यशील सोळंके यांची माहिती.

वडवणी – चालू गळीत हंगाम 2020 21 मधील 15 जानेवारी 2021 अखेर केलेल्या उसासाठी पहिल्या हप्त्याची रक्कम प्रतिटन रुपये 1885 प्रमाणे संबंधित ऊस उत्पादक सभासदाचे बँक खाते आज दिनांक 27 रोजी वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री धैर्यशील सोळंके यांनी दिली.

सन  2020-2021 हंगामांमध्ये दिनांक 26 जानेवारी 2021 अखेर एकूण 90 गाळप दिवसांमध्ये 413100 मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी 9. 57 टक्के साखर उत्ता-याने 278800 क्विंटल साखरेचे उत्पादन केलेले आहे. याच बरोबर डिस्टलरी प्रकल्पाचे माध्यमातून आज आखेर 5187920 लिटर सेफ्टीफाईड स्पिरीट चे उत्पादन घेऊन 4481 332 लिटर इथेनॉल उत्पादन घेतलेले आहे. तसेच को.जण प्रकल्पातून आजअखेर 21136932 युनिट वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस विक्री केलेली आहे. कारखाना व्यवस्थापनाने यापूर्वीच केंद्र सरकार कडील कारखान्यास आलेली एफआरपी प्रतिटन रुपये 1971 पेक्षा अधिक भाव देण्याचे धोरण कारखान्याचे मार्गदर्शक श्री.आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केलेले आहे. त्यानुसार यापूर्वी 31 डिसेंबर 2020 पर्यंत गाळप केलेल्या उसासाठी पहिला हप्ता प्रतिटन रुपये 1885 प्रमाणे पेमेंट ऊस उत्पादकांना आदा केलेले आहे. पुढील काळातील माहे 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2021 दरम्यान गाळप केलेल्या 66383 मेट्रिक टन उसाचे पेमेंट रुपये 12.51 कोटी संबंधित ऊस उत्पादकांचे बँक खाती आज रोजी वर्ग केलेले आहे.तरी या कालावधीत गाळपास पाठवलेल्या उसाचे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांनी आपले बँक शाखेशी संपर्क साधून घेऊन जावे तसेच चालू गळीत हंगामातील दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद ,ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस या कारखान्यास देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही चेअरमन श्री. धैर्यशील सोळंके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.