पोलिस अधीक्षक आर रामास्वामी यांना शौर्य पदक
– डोंगरचा राजा / ॲानलाईन.
बीड – बीडचे पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांना राष्ट्रपतींच्या वतीने दिले जाणारे शौर्य पदक जाहीर झाल्याने बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे .
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या वतीने पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना विशेष पदकाने सन्मानित केले जाते .यामध्ये बीडचे पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे .
बीड येथे रुजू झाल्यानंतर एसपी रामस्वामी यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच बेकायदेशीर सुरू असणाऱ्या धंद्याविरोधात मोहीम उघडली आहे .वाळू,मटका,गुटखा या विरोधात त्यांनी पोलिसांना कामाला लावले आहे .त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे .