Home » माझा बीड जिल्हा » पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

बीड – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 वा वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि.26 जानेवारी 2021 रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे.

याच बरोबर जिल्हयात विविध ठिकाणी ध्वजारोहण केले जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण जिल्हाधिकारी राजेद्र जगताप यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी सकाळी 8.15 वाजता होणार आहे तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते सकाळी 7.45 वाजता संपन्न होणार असून दोन्हीही ध्वजारोहण समारंभ संपल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान बीड येथील ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास सकाळी 8.45 पूर्वी शासकीय गणवेषात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परिपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.