Home » माझी वडवणी » मातीसाठी काहीतरी केलच पाहिजे – ओमप्रकाश शेटे.

मातीसाठी काहीतरी केलच पाहिजे – ओमप्रकाश शेटे.

मातीसाठी काहीतरी केलच पाहिजे – ओमप्रकाश शेटे.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– देश महासत्ता होण्यासाठी ग्रामीण भागाच्या विकासाची गरज – भास्करराव पेरे पाटील.

– ज्या मातीत जन्मलो त्या मातीसाठी काहीतरी केलच पाहिजे – ओमप्रकाश शेटे.

माजलगाव – जगामध्ये भारत देश विकसनशिल व महासत्ता होण्यासाठी ग्रामीण भागाच्या विकासाची नितांत गरज असल्याचे मत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले. तर ज्या मातीत जन्मलो त्या मातीसाठी काहीतरी केलच पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून पेरे पाटील आपण काम करत आहात त्याच पध्दतीने मी सुध्दा माझ्या गावासाठी कोठ्यावधी रूपयांचा शासकीय निधी च्या माध्यमातून सामान्य जनतेच्या हितासाठी योजना राबविल्या असल्याचे मत ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केले.
माजलगाव येथील माउली नागरी सहकारी पतसंस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी पतसंस्था चेअरमन प्रा. दत्ता वाळसकर होते. तर उद्घाटक म्हणुन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा. आ. मोहनराव सोळंके, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले, अच्युतराव लाटे, अर्जुनराव तनपुरे,गेवराई चे भाजप तालुका अध्यक्ष प्रकाशराव सुरवशे,अँड तुकाराम कोल्हे,उपप्राचार्य रमेशराव गटकळ, सतिष सावंत, महाविर मस्के, जयदत्त नरवडे, अँड. कजिम मनसबदार, पुरूषोत्तम जाधव, राहुल जगताप, बबनराव सोळंके, बंडू खांडेकर, भागवतराव शेजुळ, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्माता जिजाउ साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी महिलांना मान्यवरांच्या हस्ते मोफत शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना पेरे पाटील म्हणाले की, सध्याच्या निवडणूकीमध्ये ३० टक्के लोक हे चांगले असतात तर तीस टक्के लोक हे वाईट आहेत. मात्र चाळीस टक्के लोक बांधावरचे असतात. तेंव्हा कोणत्याही निवडणुकीत निवडणुका जिंकतांना हे चाळीस टक्के लोक ज्या बाजूला जातील तो गट जिंकतो. चांगल्या बाजुला बंधावरचे 40 टक्के लोक असल्यास आपण कोणतीही निवडणूक हारू शकणार नाहीत असे सांगत त्यांनी कोणत्याही क्षेत्रात अशी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रत्येकाने जे क्षेत्र आपण निवडु त्या क्षेत्रामध्ये मनलावुन काम करणे गरजेचे आहे असे सांगत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत हे सर्वात चांगले माध्यम असल्याचे ते म्हणाले.
त्यांच्या आदर्श गावाविषयी बोलताना पेरे पाटील म्हणाले की, मी माझ्या गावामध्ये प्रत्येक घरांकडुन वर्षाला चार हजार रूपये घेतो परंतु त्यामध्ये दररोज सकाळी गरम पाणी, चोवीस तास पिण्याचे पाणी, यासोबतच चोवीस तास पिठ, दाळी आम्ही मोफत करून देतो. त्याबरोबरच गावामध्ये इतर झाडांएैवजी फळझाडे लावत आहोत. भविष्यातही तुम्हाला आॅक्सीजन पाहिजे असेल तर प्रत्येक व्यक्तीने चार झाडे लावणे गरजेचे असुन आपले आईवडील यांची आठवण म्हणुन त्यांची राख गंगेत न टाकता जास्तीत जास्त फळझाडे लावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक बॅंकेचे कर्मचारी वैभव आकुसकर यांनी केले. यावेळी ओमप्रकाश शेटे, अच्युतराव लाटे, तुकाराम येवले, प्रा. दत्ता वाळसकर, उपप्राचार्य रमेश गटकळ यांचेही समयोचित भाषणे झाली. सुत्रसंचालन अशोक वाडेकर यांनी केले.
कार्यक्रमास परिसरातील महिला, पुरूष बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेशराव कुरे,सह संचालक मंडळ व गजेंद्र लहाणे,प्रदिप बादाडे,वैभव अकुसकर,तात्या काळे,सुर्यकांत चाळक,विशाल कचरे ,अविनाश कचरे,आदि परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.