Home » विशेष लेख » डॉ.अनुराग पांगरीकर यांचे व्याख्यान संपन्न.

डॉ.अनुराग पांगरीकर यांचे व्याख्यान संपन्न.

डॉ.अनुराग पांगरीकर यांचे व्याख्यान संपन्न.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– ए.एच.वाडिया सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन
दिनानिमित्त डॉ.अनुराग पांगरीकर यांचे व्याख्यान संपन्न.

बीड – शहरातील नामांकित अशा ए.एच.वाडिया सार्वजनिक वाचनालयाचा 57 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . वर्धापन दिनानिमित्त वाचनालयात विद्यूत रोषणाई , बलुन लावण्यात आले होते . यानिमित्त वाचनालयात दि . 23-1-2021 रोजी सायं . 5.00 वा . डॉ . अनुराग पांगरीकर यांचे “वाचाल तर वाचाल ” याविषयावर व्याख्यान झाले . यावेळी डॉ . अनुराग पांगरीकर यांनी आपल्या व्याख्यानात अनेक संदर्भ देत वाचनाचे महत्व पटवून दिले . डॉ . पांगरीकर हे बीड जिल्हा आयएमए संघटनेचे अध्यक्ष असल्या कारणाने त्यांना बीड जिल्हयात सर्वात अगोदर कोवीड -19 ची लस घेतल्याचा बहुमान त्याना मिळाला . त्यांनी यावेळी त्याचे महत्व सांगून प्रत्येकाने लस घ्यावी असा आग्रह केला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस , ज्येष्ठ संपादक श्री . नामदेवराव क्षीरसागर , विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अमोलकचंदजी सुराणा , कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री.दीपक कर्नावट , सरचिटणीस प्रदीप मुळे यांची उपस्थिती होती . प्रमुख वक्ते डॉ . अनुराग पांगरीकर यांचा परिचय प्रा.दिलीप गांधी यांनी सभागृहास करुन दिला . तसेच वर्धापन दिनांच्या निमित्ताने वाचनालयाच्या सर्व कर्मचार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालिका सौ.अनुराधाताई खरवडकर यांनी केले . शेवटी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप श्री.नामदेवराव क्षीरसागर यांनी केला . इतर वाचनाबरोबरच सध्याची गरज ओळखून संस्थेने ई – लायब्ररी करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले . वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे सह सचिव अर्थ अ‍ॅड. अजिंक्य पांडव यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता झाली . या कार्यक्रमास कोषाध्यक्ष- सौ.सुचिता औटी , निलीमाताई पाटंगणकर , डॉ.विद्यासागर पाटंगणकर , श्री . विश्वंभरराव थिगळे , अ‍ॅड.गोविंद कासट , अ‍ॅड.ओमप्रकाश जाजू , श्री.जयप्रकाश कैवाडे , अ‍ॅड.भास्करराव सिरसाळकर , गोपाल मालु , राजीव जोशी , यासह वाचनालयाचे वाचक , सभासद , कर्मचारी वृंद उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.