Home » ब्रेकिंग न्यूज » विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.

विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.

विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.

अंबाजोगाई / सचिन सुरवसे

अंबाजोगाई येथील महाराष्ट्र बँकेचा परिसरात दी २० अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने बँकेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला या मृत देहांची ओळख अद्याप ही पटू शकली नाही.बँकेच्या सुरक्षारक्षकास दुर्गंधीचा वास येऊ लागल्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता. पालथ्या अवस्थेत तरंगणारा मृतदेह दिसून आला. बँकेचे व्यवस्थापक करून ही माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलिस कर्मचारी प्रकाश साळंके आणि घुगे घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह काढण्यासाठी मनुष्यबळ पुरवावे असे पत्र पोलिसांनी नगर परिषदेला दिले होते. तरी चार तास उलटूनही नगरपरिषदेने त्यावर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे हवलदार सोळुंके,घुगे यांनी सामाजिक कार्यकर्ते मुख्तार आणि इतरांच्या मदतीने व खाजगी क्रेनच्या साह्याने पलंगावर बसून ते मृतदेह बाहेर काढले. आणि स्वराती रुग्णालयात शवगृहात पाठवून दिला.तो पर्यंत नगरपालिकेचा एकही कर्मचारी घटनास्थळी आला नाही सदर महादेव पुरुष जातीचा असून त्याचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे दोन तीन दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज असवा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.